शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

८० गुन्हेगारांना लागला ‘मोक्का’

By admin | Published: May 06, 2016 12:31 AM

पंधरा वर्षांतील कारवाई : आठ टोळ्यांचा समावेश

सांगली : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) हे हत्यार उपसले जात असले तरी कायद्यातील त्रुटीमुळे या कारवाईतून गुन्हेगार सहीसलामत सुटत असल्याचे चित्र आहे. गेल्या पंधरा वर्षात आठ टोळ्यांमधील ११५ कुख्यात गुन्हेगारांना ‘मोक्का’ लागला आहे. यातील काही प्रकरणात गुन्हेगार सहीसलामत सुटले आहेत; तर काहींचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. गुन्हेगारांना दोन ते तीन वर्षे जामीन मंजूर न झाल्याने ते कारागृहात बसले. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसला. एवढेच फलित कारवाईतून दिसून येते. संघटित गुन्हेगारी मोडीत निघावी, गुन्हेगारीला आळा बसावा, यासाठी २४ फेब्रुवारी १९९९ रोजी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायदा राज्यात अंमलात आणला. त्यानुसार पहिल्यांदा सांगलीत २००० मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख रितेशकुमार यांनी गुंड राजा पुजारी व नगरसेवक दादासाहेब सावंत या दोन टोळ्यांना मोक्का लावण्यात आला. दोन्ही टोळ्यातील पंधरा गुन्हेगार जेरबंद झाले होते. तीन वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या कायद्यान्वये सांगलीत वाटमारी करणारी हणमंत इसर्डे टोळीतील सात, सावकार भोल्या जाधव टोळीतील सात, पलूस येथील घाडगे पिता-पुत्र, इचलकरंजी येथील जावीर टोळीतील बाराजण व करेवाडी (ता. जत) येथील टोळीतील पंधराजण अशा पाच टोळ्यांना त्यांनी मोक्का लावला. दोन महिन्यापूर्वी जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनीही गुंड म्हमद्या नदाफ टोळीतील वीस जणांना मोक्का लावला आहे. यातील सावंत व पुजारी टोळीविरुद्ध पुण्यातील मोक्का न्यायालयात आरोपपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यांना जामीन न मिळाल्याने ते चार-पाच वर्षे कारागृहात होते. पुढे त्यांची निर्दोष मुक्तता झाली. गेल्या तीन-चार वर्षात झालेल्या कारवाईतील गुंड म्हमद्या नदाफ टोळी सोडली तर अन्य टोळ्यांतील गुन्हेगार जामिनावर बाहेर आले आहेत. सांगली जिल्ह्यात गेल्या पंधरा वर्षात झालेल्या कारवाईत एकाही गुन्हेगारी टोळीतील गुन्हेगारांना शिक्षा झालेली दिसत नाही. (प्रतिनिधी)कायद्याचा धाक : तरीही पळवाटांचा शोध...मोक्का कायदा लावल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाते. पण पुढे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होते. त्यामुळे याचा आढावा घेतला जात नाही. या काळात गुन्हेगार जामिनावर बाहेर येतात. त्यांच्याकडून साक्षीदारांना दमदाटी करण्याचे प्रकार सुरु होतात. पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे पुरावेही सादर करतात. त्यामुळे ते सहीसलामत बाहेर येतात. केवळ जामीन लवकर न मिळाल्याने दोन-तीन वर्षे ते कारागृहात बसल्याने गुन्हेगारीचा आलेख कमी राहिला आहे.‘मोक्का’ म्हणजे काय? स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी संघटित होऊन हिंसाचाराचा वापर करुन धमकी देऊन केलेला गुन्हा मोक्का कारवाईत गणला जातो. मोक्का लावण्यापूर्वी या टोळीतील गुन्हेगारांविरुद्ध गेल्या दहा वर्षात किती गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे का? ते शिक्षेस पात्र आहेत का? सातत्याने गुन्हेगारी कारवाया सुरु आहेत का? हे तपासून टोळ्यांना मोक्का लावला जातो. याचा प्रस्ताव पोलिस उपअधीक्षक तयार करतात. तो मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांना पाठविला जातो. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर गुन्हेगारांना अटक केली जाते. ‘मोक्का’चे विशेष न्यायालय पुणे येथे आहे. त्यामुळे या कारवाईसाठी तेथील न्यायालयाचीही परवानगी घेतली जाते. न्यायालयात सर्व आरोप सिद्ध झाल्यास गुन्हेगारांना आजन्म कारावास व एक लाखाचा दंड, अशी शिक्षेची तरतूद आहे.