सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शनिवारी काहीशी वाढ होत ८५८ जणांना निदान झाले. परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील २० अशा २१ जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण कायम असून दिवसभरात ९८१ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसचे दोन नवे रुग्ण आढळले तर दोघांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील २० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली ५, मिरज ३, वाळवा ४, तासगाव, शिराळा तालुक्यात प्रत्येकी २, आटपाडी, कवठेमहांकाळ, कडेगाव आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआर अंतर्गत ५५५७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३७२ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲंटिजनच्या ७८१९ जणांच्या तपासणीतून ५०० जण बाधित आढळले.
उपचार घेत असलेल्या ९३४१ जणांपैकी ९७९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ८२२ जण ऑक्सिजनवर तर १५७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू तर नवे १४ रुग्ण आढळले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १६९७८४
उपचार घेत असलेले ९३४१
कोरोनामुक्त झालेले १५५९४५
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४४९८
शनिवारी दिवसभरात
सांगली १११
मिरज २४
आटपाडी ४९
कडेगाव १४३
खानापूर ७६
पलूस ३७
तासगाव ११८
जत ५७
कवठेमहांकाळ ५२
मिरज तालुका ९१
शिराळा ११
वाळवा ८९