सांगली : साखर कारखाने, दूध संघ, मळीमिश्रित, केमिकल मिश्रित आणि साडपाण्यामुळे कृष्णा नदीलाप्रदूषणाचा विळखा पडला आहे. कृष्णा नदीच्याप्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनेतून निधी मंजूर झाला आहे. त्याचा अहवाल सादर झाल्यानंतर प्रदूषणमुक्तीसाठी काम सुरू होईल. राज्यासाठी सुमारे ८८० कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी पत्रकारांशी बोलताना शुक्रवारी दिली.गेल्या दहा वर्षांत कृष्णा नदीच्या प्रदूषणाचे प्रमाण खूपच वाढले आहे. साखर कारखाने, दूध संघ, तेल उद्योग, केमिकल फॅक्टरी यांनी आपल्या प्रदूषित पाण्याची विल्हेवाट लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते विषारी पाणी कृष्णा नदीत सोडण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीत. कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीरच आहे. नदीला विषारी विळखा पडतो आणि कधीतरी त्याला भिडावेच लागणार आहे. मी त्यासाठी आग्रही भूमिका घेईल, असे खासदार संजय पाटील यांनी सांगितले.यावेळी कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर म्हणाल्या, केंद्र शासनाने महाराष्ट्रातील नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी जवळपास तीन हजार २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये कृष्णा नदीचे कऱ्हाड ते राजारापूर बंधाऱ्यापर्यंत प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी ८८० कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. या निधीतून नदीतील गाळ काढण्यासह सांडपाणी व्यवस्थापनावर काम केले जाणार आहे.
शंभुराजे देसाई यांच्या भूमिकेबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार : संजय पाटीलकोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत अजूनही काहींची लोकांना नागविण्याची भूमिका घेतली जात आहे. मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. त्यांनी पाणी सोडण्यात अडचण असता कामा नये, असे स्पष्ट केले आहे. तरीही, काही घोळ सुरू आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आहे. आता अधिक टोकाला जाण्याची वेळ येऊ नये, असा इशारादेखील खासदार संजय पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांचे नाव न घेता दिला.
कृष्णा नदीचे प्रदूषण गंभीरखासदार संजय पाटील म्हणाले, कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीरच आहे. नदीला विषारी विळखा पडतो आणि कधीतरी त्याला भिडावेच लागणार आहे. मी त्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहे. या प्रश्नाबाबत ‘‘जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांच्याशी मी बोललो आहे. त्यांचा या विषयातील अभ्यास प्रचंड आहे. त्यांच्याशी चर्चा करून नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे.