कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील आरोग्य उपकेंद्रात गावातील ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या ९४ टक्के नागरिकांचे लसीकरण रविवारी (दि. ११) पूर्ण झाले.
गावात ४५ पेक्षा जास्त वय असणारे १८६६ नागरिक आहेत. १ एप्रिलपासून उपकेंद्रात १६५६ नागरिकांचे लसीकरण झाले. त्यापूर्वी कामेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात १०० नागरिकांना लस देण्यात आली हाेती. त्यामुळे रविवारअखेर १७५६ जणांचे म्हणजेच ९४ टक्के लसीकरण पूर्ण झाले. रविवारी ज्येष्ठ महिला स्वातंत्र्यसेनानी यशवंत रामजी पाटील यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्ते डी. वाय. पाटील यांच्या मातोश्री ताराबाई यशवंत पाटील (वय १०५) यांनीही लस घेतली. आता केवळ ११० नागरिकांचे लसीकरण बाकी असून दोन दिवसांत ते पूर्ण होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकेंद्रातील डॉ. सोमनाथ अंकोलीकर, आरोग्य सहाय्य व्ही. एस. कोरे व आरोग्य कर्मचारी यासाठी परिश्रम घेत आहेत.
फाेटाे : ११ कामेरी २
ओळ : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील आराेग्य उपकेंद्रात रविवारी १०५ वर्षीय ताराबाई पाटील यांनी लस घेतली.