शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

‘कॉल डिटेल्स’वरून ९२ जणांकडे चौकशी वारणानगर चोरी प्रकरण : विश्वनाथ घनवट, दीपक पाटील यांच्याशी संपर्क पडला महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:59 PM

सांंगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे सव्वानऊ कोटीच्या रकमेवर डल्ला मारल्याप्रकरणी अटकेत

सांंगली : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे सव्वानऊ कोटीच्या रकमेवर डल्ला मारल्याप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, हवालदार दीपक पाटील यांच्या मोबाईलचे ‘कॉल डिटेल्स’ काढून कोल्हापूर ‘सीआयडी’ने तपासाला गती दिली आहे. सांगली शहर परिसरातील तब्बल ९२ जण नोटाबंदीनंतर या दोघांच्या संपर्कात आल्याची माहिती पुढे आल्याने, ते संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. यामध्ये काही पोलिस अधिकारी, कर्मचारी, तसेच इतरांचा समावेश आहे.

सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तीन वर्षापूर्वी मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये झोपडीवजा घरावर छापा टाकून तेथून तीन कोटीची रोकड जप्त केली होती. याप्रकरणी मैनुद्दीन मुल्ला यास अटक केली होती. चौकशीत त्याने ही रक्कम वारणानगर येथून चोरल्याची कबुली दिली होती. गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मुल्लाला सोबत घेऊन वारणानगरला छापा टाकून तिथेही कोट्यवधीची रोकड जप्त केली होती. पण या कारवाईवेळी पथकाने सव्वानऊ कोटीची रोकड परस्पर हडप केली होती. हा प्रकार तब्बल वर्षभरानंतर उघडकीस आला.

याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहाय्यक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. कुरळपकर सोडला, तर सर्वजण सध्या कोल्हापुरातील कळंबा कारागृहात आहेत.

कोल्हापूर सीआयडीकडून या गुन्ह्याचा तपास सुरु आहे. संशयितांकडून तपासात कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याने, एक रुपयाही त्यांच्याकडून जप्त करण्यात यश आलेले नाही. अटकेतील काही संशयितांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे, तर या गुन्ह्यातील फिर्यादीने, तपास योग्य झाला नसल्याची तक्रार केली असल्याचे समजते.

केंद्र सरकारने पाचशे व हजारच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर मार्च २०१७ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे सीआयडीने या सर्वांचे ‘कॉल डिटेल्स’ काढून तपासाला नवी दिशा दिली आहे.केंद्र सरकारतर्फे नोटाबंदीनंतर संशयितांच्या संपर्कात कोण- कोण आले, त्यांची यादी बनविण्यात आली आहे. यामध्ये दोन किंवा तीनपेक्षा जादा कॉल झालेले लोक संशयिताच्या पिंजºयात उभे केले आहेत. विशेषत: विश्वनाथ घनवट व दीपक पाटील या दोघांच्या एकाचवेळी संपर्कात आलेले तब्बल ९२ जण संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.कोल्हापूर ‘वारी’कॉल डिटेल्स’वरुन सीआयडीने चौकशीसाठी आमंत्रित केल्याने अनेकांची कोल्हापूरला सीआयडी कार्यालयात ‘वारी’ सुरु झाली आहे. यामध्ये शहरातील तसेच दीपक पाटीलच्या कवलापूर (ता. मिरज) गावातील काहीजणांचा समावेश आहे. चौकशीला बोलाविल्यानंतर संशयितांना कशासाठी मोबाईल संपर्क साधला होता, अशी विचारणा करुन त्यांचा जबाब नोंदवून घेतला जात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील काही पोलिसांनाही चौकशीसाठी बोलाविले आहे. सहा महिन्यापूर्वी सांगलीच्या सीआयडी कार्यालयातही स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या तत्कालीन पाच पोलिसांची चौकशी झाली आहे. यातील अरुण टोणे हा पोलिस अनिकेत कोथळे खून प्रकरणात अडकला आहे.कुरळपकर कुठे आहे?गुन्हा दाखल होऊन वर्षाचा कालावधी होत आला तरी, निलंबित सहाय्यक पोलिस फौजदार शरद कुरळपकर याचा शोध घेण्यात सीआयडीला यश आलेले नाही. सर्व संशयित सीआयडीला शरण आले. पण कुरळपकर गुंगारा देत फरारी आहे. स्थानीक पोलिसांचे सहकार्य मिळेनासे झाले आहे.