शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी चांगली बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन NSA माईक वॉल्ट्झ, चीनचे कट्टर टीकाकार!
2
...म्हणूनच मी भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही; शरद पवारांचा प्रथमच मोठा गौप्यस्फोट
3
"काही राजकारण्यांकडे ५-५ हजार एक जमिनी, ना#डा फिरतो की काय त्याच्यावर अख्खा?"; राज ठाकरे संतापले
4
‘त्या’ पाच कुत्र्यांची हत्या सायको किलरकडून?; कांदिवलीमधील नाल्यात आढळले मृतदेह!
5
₹२५००००००० च्या दंडापासून मुकेश अंबानींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयानं सेबीची याचिका फेटाळली
6
कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उत्साहात; मानाचे वारकरी लातूर जिल्ह्यातील 
7
Israel Hezbollah : हिजबुल्लाहचा इस्रायलवर मोठा हल्ला; १६५ हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, हायफामध्ये हाहाकार
8
बलात्कार आणि हत्येच्या आरोपातील मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी खेळली अशी चाल, त्यानंतर...  
9
एक टायपो आणि दिवाळखोरीच्या उंबऱ्यावर आलेली 'ही' बँक; एका फटक्यात गमावलेले १८ कोटी ९८ लाख
10
"पवित्र महाकाव्याभोवती हा सिनेमा बागडत राहतो अन्..."; 'सिंघम अगेन' पाहून पृथ्वीक प्रतापने लिहिलेली पोस्ट चर्चेत
11
आजचे राशीभविष्य - १२ नोव्हेंबर २०२४, नोकरी, व्यवसायात कामाची प्रशंसा होईल, मान-प्रतिष्ठा वाढेल
12
शरद पवार : जखमी वाघाची निकराची झुंज
13
प्रचाराचा आज ‘मंगळ’वॉर; पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या तीन सभा, राहुल गांधींच्या दाेन सभा!
14
आजचा अग्रलेख: पैसे कोठून आणणार..?
15
बीकेसी : नुसतीच सोन्याची लंका; रोज १ ते २ तास जीवघेणा प्रवास, जाण्यायेण्यातच वाया जातोय वेळ आणि पैसा!
16
माजी आमदार आडम यांच्या घरावर दगडफेक; सोलापुरात खळबळ
17
भरधाव वाहनाने दुचाकीला उडवले; भीषण अपघातात दाेघे जागीच ठार 
18
"सुन लो ओवैसी तिरंगा लहराएंगे पाकिस्तान पर" ; मालाडमधल्या सभेत फडणवीसांची घोषणाबाजी
19
दहिसरला १.४३ कोटींचे दोन किलो सोने जप्त
20
तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसताहेत : सरसंघचालक; जागतिक शांतीसाठी जगाची आता भारतावर आशा!

बनावट सोने देऊन इस्लामपुरातील व्यापाऱ्याला घातला गंडा, कोल्हापूरच्या दोघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 11:59 AM

आईच्या उपचाराकरिता दोन चैन ठेवून घेत पैसे देण्याची मागणी

इस्लामपूर : येथील बसस्थानक परिसरातील ओंकार कॉलनीमधील व्यापाऱ्यास कोल्हापूर येथील दोघांनी बनावट सोन्याचे दागिने देत ३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली. हा प्रकार ३१ जानेवारीला सायंकाळी ७ च्या सुमारास घडला.याबाबत नितीन मनोहरलाल भंडारी (वय ४३ रा. ओंकार कॉलनी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद पारसमल भंडारी (रा. बिंदू चौक,कोल्हापूर) आणि विरेश ऊर्फ लोकेश आण्णाप्पा कुरले (रा. ऐश्वर्या पार्क, कोल्हापूर) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापूर येथील विनोद भंडारी आणि विरेश कुरले हे दोघे ३१ जानेवारीला इस्लामपूर येथील नितीन भंडारी यांच्याकडे आले होते. यावेळी विनोद याने विरेशच्या आईच्या उपचाराकरिता पाच लाख रुपयांची आवश्यकता आहे,असे सांगत विरेशकडील ८३ ग्रॅम वजनाच्या हॉलमार्क असलेल्या दोन चैन ठेवून घेत पैसे देण्याची मागणी केली.त्यावर नितीन भंडारी यांनी परतफेडीच्या बोलीवर दोघांना ३ लाख २५ हजार दिले. त्यानंतर त्यांनी या दोन सोन्याच्या चेनची तपासणी केली असता त्या खोट्या असल्याचे आढळून आले. नितीन भंडारी यांनी दोघांकडे पैशाची मागणी केल्यावर दोघांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नितीन भंडारी यांनी पोलिसात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.रॅकेट असण्याची शक्यताकोल्हापुरातील दोघा भामट्यांनी येथील व्यापाऱ्यास बनावट दागिने हॉलमार्क दाखवून खरे भासविण्याचा प्रताप केला. वास्तविक हॉलमार्क हा सोने व्यापारातील शासकीय सनद मानला जातो. त्याचा गैरवापर करत या दोघांनी बऱ्याचजणांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. आईच्या उपचाराचा बहाणा करत या दोघांनी चैनबाजी केल्याचीही चर्चा आहे. याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस