शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
3
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
4
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
5
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
6
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
7
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
8
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
9
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
10
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
11
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
12
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
13
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
14
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
15
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
16
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

यात्रेनंतर ६५ किलोमीटरपर्यंत घोड्यांची फरफट, सांगलीवाडीतील सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

By घनशाम नवाथे | Updated: February 27, 2025 00:00 IST

Sangli News: कर्नाटकातील मायाक्का चिंचली यात्रेतून सांगलीवाडीपर्यंत तब्बल ६५ किलोमीटर अंतरापर्यंत तोंडाला फेस येईपर्यंत घोडागाडी जबरदस्तीने पळवणाऱ्या सहाजणांविरुद्ध सांगली शहर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

- घनशाम नवाथे  सांगली - कर्नाटकातील मायाक्का चिंचली यात्रेतून सांगलीवाडीपर्यंत तब्बल ६५ किलोमीटर अंतरापर्यंत तोंडाला फेस येईपर्यंत घोडागाडी जबरदस्तीने पळवणाऱ्या सहाजणांविरुद्ध सांगली शहर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

संशयित पंकज अभिजित कांबळे (रा. बाळूमामा मंदिरजवळ, सांगलीवाडी), सचिन गोविंद शिंदे (रा. क्रांती चौक), चंद्रकांत दीपक फडतरे (रा. हनुमान चौक), दत्तात्रय कदम (रा. राहुलराजे चौक), मयूर महादेव पवार (रा. सोसायटीजवळ), कृष्णा दत्तात्रय बोराडे (रा. गाडगीळ प्लॉट, सांगलीवाडी) या सहाजणांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० नुसार आणि बीएनएस २२३, २८१, २८५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मायाक्का चिंचलीची यात्रा संपल्यानंतर मध्यरात्रीनंतर शहरातून हुल्लडबाजी, आरडाओरड करत नागरिकांची झोपमोड करण्याचा प्रकार गतवर्षी घडला होता. यावर्षी दि. १७ रोजी मध्यरात्रीनंतर दोन वाजता शेकडो घोडागाडी, बैलगाडी, दुचाकी घेऊन जमाव हुल्लडबाजी करत सांगलीवाडी निघाला होता. तेव्हा सांगलीत टिळक चौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर लाठीमार करताच त्यांची पळताभुई थोडी झाली. अनेकजण दुचाकी जागेवर टाकून पळाले. काहींनी घोडागाड्या दामटून पलायन केले.

हुल्लडबाजी करणाऱ्यांची पोलिसांनी चांगलीच खोड मोडल्याबद्दल नागरिकांनी कौतुक केले. समाज माध्यमावर पोलिस कारवाईचे स्वागत झाले. विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी ही कारवाई करणाऱ्या पोलिस निरीक्षक किरण चौगले यांना शाबासकी दिली.

दरम्यान, मायाक्का चिंचली ते सांगलीवाडी असे ६५ किलोमीटर विनापरवाना घोडागाड्या पळवल्या. गुलालाची उधळण केली. दुचाकीवरून आरडाओरड केला. बेदरकारपणे वाहने चालवली. तसेच घोडागाडीला दोन्ही बाजूंनी दुचाकींनी जबरदस्तीने ओढून घोड्यांना तोंडाला फेस येईपर्यंत पळवले. त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त ओढून छळ केल्याबद्दल पोलिसांनी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस कर्मचारी सद्दामहुसेन मुजावर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

इतरांचाही शोध घेणारमध्यरात्रीनंतर दोन वाजता दंगा करणाऱ्या सहाजणांची नावे निष्पन्न करून गुन्हा दाखल केला आहे. इतरांचाही शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगली