शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

Sangli News: सावंतपुरातील शेतकऱ्याने शोधली द्राक्षाची नवी जात, राष्ट्रीय संशोधन केंद्राने प्रमाणपत्रही दिले  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 4:40 PM

हा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत आहेत.

पलूस : सावंतपूर (ता. पलूस) येथील प्रयोगशील शेतकरी जयकर राजाराम माने यांनी सलग नऊ वर्षे प्रयोग करून काळ्या द्राक्षाची ब्लॅक क्वीन बेरी (Black Kwin Berry) ही नवीन जात विकसित केली आहे. दिल्ली येथील राष्ट्रीय संशोधन केंद्राने त्यांना प्रमाणपत्रही दिले आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येत आहेत.माने यांनी पंधरा ते वीस वर्षांत शेतात माणिक चमन, सरिता, काजू, सुपर सोनाक्का, कृष्णा अशा विविध जातींच्या द्राक्षांचे उत्पन्न घेतले. वर्षभर लागणाऱ्या औषधांपेक्षा टाॅनिकचाच खर्च जास्त होत होता. हे परवडत नसल्याने रोगाला बळी न पडणारी, बाजारपेठेत मागणी असणारी, चांगले उत्पन्न देणारी द्राक्षाची नवीन जात विकसित करण्यास २०१२ पासून सुरुवात केली.सुरुवातीला द्राक्षवेलीच्या एका काडीवर प्रयोग केला. जंगली द्राक्षवेलीवर वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या द्राक्षवेलीचे डोळे भरले. नवीन जात विकसित झाल्याची खात्री २०१९ मध्ये पटल्यानंतर परिसरातील बागायतदारांना ही काळी द्राक्षे दाखवली. नंतर तीन एकरामध्ये नवीन जातीची लागण केली. या नव्या जातीला मित्रांच्या मार्गदर्शनाने ‘ब्लॅक क्वीन बेरी’ असे नाव दिले.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या (नॅशनल रिसर्च सेंटर) दिल्ली येथील सदस्यांनी सलग तीन वर्षे भेट देऊन या द्राक्षाचा अभ्यास केला. नवीन जातीचे वीस ते तीस नमुने घेऊन तपासणी केली. त्यानंतर पंधरा नोव्हेंबर २०२२ रोजी एनआरसीने या जातीला प्रमाणपत्र दिले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी