शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शिवसैनिक, बोललो ते बोललो..."; आईवरून शिवीगाळ केल्याचं अंबादास दानवेंकडून समर्थन
2
जनरल मोटर्स, फोर्ड आता फोक्सवॅगन! जगातील सर्वात मोठी कंपनी भारतात अपयशी ठरली 
3
"आज ते नाहीत, याचं मला खूप शल्य राहील...", विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडे भावुक!
4
Video - "पत्र्याच्या घरात राहणारी मुलगी आज..."; रुपाली भोसलेने नवं घर घेताच गौरी कुलकर्णी भावुक
5
Priyanka Gandhi : "BJP-RSS चं काम हे फक्त हिंसा, द्वेष आणि भीती पसरवणं..."; प्रियंका गांधी कडाडल्या
6
धक्कादायक! मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या ठिकाणाची ड्रोनद्वारे टेहळणी
7
बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण
8
"लोकांना तुमच्यापेक्षा जास्त विश्वास पंचायतमधल्या सरपंचावर'; निवडणूक आयोगावर खासदाराचे ताशेरे
9
"सत्ताधाऱ्यांना संरक्षण मागावं लागल्याचे देशाने पाहिलं"; राहुल गांधींच्या विधानाचे राऊतांकडून समर्थन
10
राहुल गांधींनी सर्व हिंदूंची माफी मागावी, चित्रा वाघ यांची मागणी
11
थलायवासोबत 40 वर्षांपासून काम केलं नाही, कमल हसन यांनी सांगितलं कारण; म्हणाले...
12
उद्धव ठाकरेंच्या शिलेदारामुळे सगळ्यांचंच गणित बिघडणार; मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या रिंगणात?
13
'या' दिग्दर्शकाला पाहून शाहरुखला आली 'क..क..क..किरण' बोलण्याची कल्पना; जुही चावलाचा खुलासा
14
"शिवीगाळ झाल्यामुळे मी रात्रभर झोपू शकलो नाही"; दानवेंच्या निलंबनाची प्रसाद लाड यांची मागणी
15
Divine Power IPO: पहिल्याच दिवशी ३००% चा फायदा, ४० रुपयांचा शेअर १६० पार; गुंतवणूकदार मालामाल
16
हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत, SEBI कडून कारणे द्या नोटीस; भारतीय दिग्गज बँकेचंही आलं नाव पुढे 
17
No Entry फेम सेलिना जेटलीनं बॉलिवूडला केला रामराम, वैवाहिक आयुष्याचा घेतेय आनंद
18
"राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी; आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा, मी..."
19
Share Market 2 july : शेअर बाजारात आधी तेजी, मग घसरण; अदानी पोर्ट्स, पॉवर वधारला; टाटा मोटर्समध्ये घसरण

सांगलीतील चिंचणीत सापडले चार फुटांचे मांडूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 5:01 PM

देवराष्टे : चिंचणी-अंबक (ता. कडेगाव) येथील लोकवस्तीत एका घरात उंदराच्या बिळात घुसलेला मांडूळ तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर ...

देवराष्टे : चिंचणी-अंबक (ता. कडेगाव) येथील लोकवस्तीत एका घरात उंदराच्या बिळात घुसलेला मांडूळ तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढला. चार फूट लांबीचा एवढा मोठा मांडूळ पाहून सर्वजण चक्रावून गेले. सर्पमित्र महेश पाटील यांनी त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. वनविभागाला याची माहिती दिली. अंधश्रद्धेमुळे मांडुळाचा बळी जाऊ नये यासाठी गोपनीयपणे मांडूळ पकडून सुखरूप सोडले.नैसर्गिकदृष्ट्या मांडूळ साप तीन ते साडेतीन फूट लांब व जाडजूड असतो. तो बिनविषारी असतो. पण चिंचणीत सापडलेला मांडूळ हा चार फूट लांबीचा जाडजूड होता. तो मादी असल्याचे सांगण्यात आले.चिंचणीतील एका घरात साप शिरल्याचे घर मालकाच्या लक्षात आले. त्यांनी सर्पमित्र महेश पाटील यांना याबाबत कळवले. पाटील यांनी तत्परता दाखवली. परंतु तो बिळात गेल्यामुळे बाहेर काढणे अवघड होते. संबंधित घरातील सर्वजण साप असल्यामुळे जीव मुठीत धरून बसले होते. पहिल्याच दिवशी मांडूळ असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याला जिवंत पकडण्यासाठी परिसरात खुदाई केली. पण मोठे बीळ असल्यामुळे मांडूळ हाताला लागणे अवघड झाले होते.तीन दिवस घरातील लोक नजर ठेवून होते. अखेर तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मांडूळ पहाटेस बिळाबाहेर आला. त्यामुळे पकडणे शक्य झाले. एवढा मोठा मांडूळ आजपर्यंत कोणाच्या नजरेस पडला नव्हता. बिळातून बाहेर काढल्यानंतर चार फुटांपेक्षा मोठा पूर्ण वाढ असलेला मांडूळ पाहून बघणारे चक्रावून गेले.सर्पमित्र महेश पाटील यांनी अनेक बाबतीत गुप्तता ठेवली. पकडलेला मांडूळ हा कोणत्याही प्राण्याचे भक्ष बनू नये याची काळजी घेतली. वनविभागाला कळवून रात्रीच्या वेळी मऊ मातीच्या ठिकाणी रानात सोडून दिले. पाटील यांना संदीप चौगुले, विशाल पवार यांचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Sangliसांगली