लक्ष्मण सरगरआटपाडी मध्ये भरलेली उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक शेळ्या मेंढ्याच्या यात्रेत तब्बल पन्नास लाख रुपयांच्या बकऱ्याची बोली लागली असून आतापर्यंत चाळीस लाख रुपयांना मागणी करण्यात आली आहे.माडग्याळ जातीच्या बकरे व मेंढीची आकरा लाखा पासून ते पन्नास लाख रुपयांची मागणी करण्यात येत आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी उत्तरेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त होत असणारा शेळ्या मेंढ्याचा बाजारामध्येसांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्हा सह परराज्यातील शेतकरी व व्यापारी यांनी मोठ्या प्रमाणात यात्रेत हजेरी लावली आहे.
कोरोनानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असल्याने शेतकरी पशुपालक व व्यापारी याचा उत्साह ओसांडून वाहत आहे.याचं बरोबर शेतकरी पशुपालक यांच्या शेळ्या,बोकड,मेंढी, बकरे यांना चांगला दर मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.तर अनेक जातिवंत बकरे व मेंढी यांची खरेदी विक्री चांगल्या बोलीने झाल्यास शेतकरी हलगीच्या निनादात आपला जोश व आनंद व्यक्त करत आहेत. कुंडलिक एरंडे रा. शिवने ता. सांगोला जि. सोलापूर यांचा 40 लाख रुपये किमतीचा बकरा माणदेशातील आटपाडी येथील उत्तरेश्वर देवस्थानच्या कार्तिक यात्रेनिमित्त सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. शुक्र ओढा परिसरात पौर्णिमे पासून यात्रेस प्रारंभ झाला आहे.
आटपाडीचे ग्रामदैवत उतरेश्वर देवस्थान निमित्त शेळ्या मेंढ्यांचा बाजार
यात्रेतील या बाजारात दहा हजाराहून अधिक शेळ्या मेंढ्या खरेदी विक्रीसाठी आले आहेत.यात्रे मध्ये महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा या राज्यातून व्यापारी दलाल खरेदीसाठी आले आहेत. पाच हजारापासून 50 लाख रुपये किमती चे बकरे या यात्रेत विक्रीसाठी आले आहेत.ही यात्रा दहा दिवस चालत आहे दोन दिवस शेळ्या मेंढ्यांचा खरेदी विक्रीचा बाजार होत आहे . दोन दिवस चालणाऱ्या या शेळ्या मेंढ्याच्या बाजारात कोठावधी रुपयाची उलाढाल होत असते .पश्चिम महाराष्ट्रामध्ये माणदेशातील आटपाडी तालुक्यातील शनिवारचा आठवडा बाजार शेळ्या मेंढ्या साठी प्रसिद्ध आहे .सकाळी सहा वाजता सुरू होणारा बाजार अवघा चार तास चालतो या बाजारात कोट्यावधीची उलाढाल होत असते.
माणदेशातील माडग्याळ जातीच्या बकऱ्याच्या किमती दीड लाखापासून 74 लाखापर्यंत मेंढपाळ सांगत आहेत.या यात्रेत शेकडो वाहने शेळ्या मेंढ्यांची ने आण करत आहेत. हौशी मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन वाजत गाजत नाचत गुलाल उधळत फटाक्याची आताशबाजी करत मिरवणुका काढत आहेत. हलगीच्या वाद्याने यात्रा घुमु लागली आहे. यात्रेनिमित्त विविध स्टॉल ओढा परिसरात उभारले जात आहेत.माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी यात्रा व्यवस्थित पार पडावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती ,नगरपंचायत, आटपाडी व्यापारी संघटना ,मेंढपाळ, उत्तरेश्वर देवस्थान समिती यांची बैठक घेऊन सोयी सुविधा यांचा आढावा घेत पुरवल्या आहेत.
पूर्वी यात्रा माणदेशातील खिलार जनावरासाठी प्रसिद्ध होती
गेली दहा वर्ष झाले दुष्काळी परिस्थितीमुळे जनावराचा बाजार मोडला आहे. मात्र शेळ्या मेंढ्यांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. माणदेशातील डाळिंब, बोर, शेळ्या, मेंढ्या व जातिवंत खिलार जनावर संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्व यात्रेची सुरुवात आटपाडी कार्तिक महिन्यात पौर्णिमेपासून भरणाऱ्या यात्रेपासूनच दरवर्षी होत असते. गेली दोन वर्ष कोरोनाच्या परिस्थितीमुळे यात्रा भरल्या नाहीत.परिणामी शेळ्या मेंढ्यांच्या खरेदी विक्रीवर परिणाम झाला होता. परंतु यावर्षी मोठ्या उत्साहात व जोशात यात्रा शेतकरी व मेंढपाळ यांनी भरवली आहे.