शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सांगलीत भरदिवसा शाळेमध्ये नववीच्या विद्यार्थ्यावर खुनी हल्ला, किरकोळ वादातून प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:29 AM

संशयित वर्गातील विद्यार्थी

सांगली : येथील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सलमान जावेद मुल्ला (वय १४, रा. शंभरफुटी रस्ता) याच्यावर वर्गातीलच एका विद्यार्थ्यांने कोयत्याने मानेवर वार केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी घडला. हल्ल्यानंतर संशयित पसार झाला आहे. या प्रकाराने शाळेत खळबळ उडाली होती. गेले काही दिवस दोघांमध्ये वाद सुरू होता.दरम्यान, जखमी सलमान याच्यावर विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेवरील जखमेवर ३५ टाके घालण्यात आले. रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात खुनी हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इयत्ता नववीमध्ये शिकणारा सलमान आणि संशयित अल्पवयीन मुलगा या दोघांत काही दिवसांपासून किरकोळ कारणातून वाद सुरू होता. एकमेकाला चिडवाचिडवी सुरू होती. दोन दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. दोघांमधील वाद धुमसत असतानाच संशयिताने सोमवारी दप्तरातून कोयता आणला होता. सायंकाळच्या सुमारास त्याने बाकावर बसलेल्या सलमानवर कोयत्याने मानेवरच थेट वार केला. यावेळी वार अडवताना सलमानच्या हातावरही जखम झाली. भर शाळेत हल्ला झाल्यानंतर मुलांमध्ये घबराट निर्माण झाली. मुलांचा आरडाओरड सुरू झाला. जखमी सलमानला शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांनी उचलून सिव्हिलमध्ये उपचारास नेले. तेथून विश्रामबागच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेवरील जखमेवर ३५ टाके घालण्यात आले. उपचारानंतर सलमानची प्रकृती थोडीसी स्थिर बनली आहे.सलमानवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोर मुलगा पसार झाला आहे. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी शाळेत जाऊन माहिती घेतली. संशयित हल्लेखोराच्या पालकास बोलावून घेतले. त्यांनाही हा प्रकार ऐकून धक्का बसला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याबाबत हालचाली सुरू होत्या.

पालकवर्गात भीतीहल्ल्यातील जखमी सलमान हा सामाजिक कार्यकर्ते जावेद मुल्ला यांचा मुलगा आहे. हल्ल्यानंतर मुल्ला कुटुंबीय घाबरले होते, तसेच इतर पालकवर्गातही भीतीचे वातावरण होते.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थी