शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

Crime News miraj: फसवणुकीचा नवा फंडा; तरुणीचे लग्न लावून साडेतीन लाखांचे दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:36 PM

या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची दिली धमकी

मिरज : मिरजेत तरुणीचे लग्न लावून साडेतीन लाखांचे दागिने लुटल्याबद्दल म्हाडा कॉलनीतील सारिका अमित शिंदे या महिलेविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सारिका शिंदे ही महिला म्हाडा काॅलनीत किराणा दुकान व वधू-वर सूचक मंडळ चालवते. म्हाडा कॉलनीतील आशा वाघमारे यांची मुलगी प्रिया हिचा विवाह गोवा येथील शशांक सावंत यांच्याशी ठरवून मध्यस्थी करून सावंत यांच्याकडून कमिशन म्हणून तिने एक लाख रुपये घेतले. महिन्याभरापूर्वी वाघमारे यांच्या मुलीचा विवाह गोवा येथे झाल्यानंतर लग्नात आलेली अहेराची ७० हजार रुपये रक्कम काढून घेतली.त्यानंतर मुलीच्या सासऱ्यांना विनंती करून प्रिया हिला घरी भोजनास बोलावले. प्रिया व तिच्या आईस घरात एक दिवस मुक्काम करण्याचा आग्रह केला. दोघी तेथे राहिल्यानंतर मुलीची आई आशा वाघमारे यांना थोबाडीत मारून खाली पाडले. प्रिया हीस मारहाण करून संसार मोडण्याची धमकी देऊन सासरच्या मंडळींनी घातलेले अंगठ्या, गंठण, बांगड्या, पाटल्या, नेकलेस, चेन असे ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे आठ तोळे सोने जबरदस्तीने काढून घेतले. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत प्रिया शशांक सावंत (रा. गोवा) हिने मिरज शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जबरदस्तीने साडेतीन लाखांचे दागिने काढून घेतल्याबद्दल सारिका अमित शिंदे (वय ३५, रा. म्हाडा काॅलनी) हिच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात मारहाण व खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न