शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

पाचगणीतून भरकटलेले पॅराग्लाइडर उतरले दिघंचीच्या माळावर, फ्रेंच नागरिक तब्बल सहा तास भरकटला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:14 PM

फ्रान्समधून आलेल्या पिअर अलेक्सचे दिघंचीकरांनी केले स्वागत

अमोल काटेदिघंची : सातारा जिल्ह्यातील पाचगणीतून भरकटलेले पॅराग्लाइडर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दिघंची (ता. आटपाडी) येथे उपसरपंच तेजश्री मोरे याच्या शेतात उतरले. सुटी घालवण्यासाठी भारतात आलेला फ्रेंच नागरिक पियर अलेक्स हा पाचगणी येथून पॅराग्लाइडिंग करताना तब्बल सहा तास भरकटला. आवळाई रस्त्यावरील मोरे यांच्या शेतात उतरल्यानंतर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली हाेती. युवकांनी पाहुणचार करून या परदेशी पाहुण्याला खासगी माेटारीतून पाचगणीस रवाना केले. मागील आठवड्यातही पिअर अलेक्स भरकटून सांगोला तालुक्यातील इटकी येथे आला होता.सुटी घालवण्यासाठी अनेक फ्रेंच नागरिक भारतात येतात. पॅराग्लाइडिंगसाठी सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पोहोचतात. पॅराग्लाइडिंग हा धाडसी लोकांचा छंद आहे. त्यासाठी पाचगणी येथे परदेशी लोकांची माेठी गर्दी असते. अनेकदा वाऱ्याचा अंदाज न आल्याने पॅराग्लाइडर भरकटतात. असाच प्रकार सोमवारी पियर अलेक्सबाबत घडला. पाचगणी येथून निघाल्यानंतर तब्बल सहा तास ताे हवेत भरकटला. दिघंची येथील माळावर ताे सुरक्षितपणे उतरला. विकास मोरे, वासुदेव पुजारी, महादेव पुसावळे, सचिन माईनकर, संदीप धर्माधिकारी, युवराज चव्हाण, आदींनी त्याची विचारपूस केली. खासगी वाहनातून त्याला पाचगणीला रवाना केले.मदत करण्याच्या वृत्तीचे कौतुक दिघंचीमधील एका युवकाने पाचगणीतून भरकटून आलेल्या पिअर अलेक्स याच्याशी इंग्रजीतून संवाद साधला. भारताबद्दल काय वाटते, असे विचारल्यानंतर त्याने भारतातील नागरिकांच्या मदत करण्याच्या वृत्तीचे कौतुक केले. ‘मी इथे उतरल्यानंतरही अनेक लोक मदतीला आले, हे बघून मी भारावून गेलो’ असे सांगत ‘ही भारतीय संस्कृती अन्य देशांत पाहायला मिळत नाही,’ अशी टिप्पणीही त्याने केली.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसर