शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

सांगली: रस्ता नाय तर शाळा नाय, रस्ता रोको आंदोलनात शाळकरी मुलाचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 2:22 PM

आंदोलनात महिला व शाळेच्या लहान मुलाचा देखील सहभाग

वांगी (सांगली): वांगी (ता. कडेगाव) येथील देवराष्ट्रे रोड लगत असणाऱ्या स्मशानभूमीच्या पाठीमागील लोकवस्तीकडे जाणारा रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी आज, गुरुवारी सकाळी ८ वाजता थेट रस्त्यावर उतरुन जुना सांगली - सातारा व वांगी ते सोनहीरा कारखाना रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनात महिला व शाळेच्या लहान मुलाचा देखील सहभाग होता. रस्ता नाय तर शाळा नाय अशा घोषणा देत शाळकरी मुलांनी परिसर दणाणून सोडला.वांगी येथील देवराष्ट्रे रोड लगत असणाऱ्या स्मशानभूमी पाठीमागील बाजूस जवळपास ४० कुटुंबांची लोकवस्ती आहे. या लोकवस्तीकडे जाण्यासाठी गावाजवळून रस्ता होता. मात्र काही दिवसापुर्वी हा रस्ता बंद झाला. त्यानंतर स्मशानभूमी पासून पर्यायी रस्ता सुरू केला. मात्र येथेही वाद झाल्यामुळे १५ ऑगस्ट पासून हाही रस्ता संरक्षण तार लावून बंद करण्यात आला. त्यामुळे येथील नागरिकांना येण्या-जाण्याची मोठी अडचण होत आहे. प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून यावर तोडगा न निघाल्याने संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन जुना सांगली - सातारा व वांगी ते सोनहीरा कारखाना परिसरात रस्ता रोको आंदोलन केले...अन्यथा तीव्र आंदोलनयेत्या आठ दिवसात चारही बाजूने रस्ता करावा अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी संतप्त नागरिकांनी दिला. यावेळी गट विकास अधिकारी भानुदास साळवी व नायब तहसीलदार दिलीप भीसे यांना निवेदन देऊन रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनावेळी चिचणी - वांगीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.

टॅग्स :Sangliसांगली