सांगली : पतीच्या रखेलीने केलेल्या हल्ल्यात महिलेचा कान फाटला. ही घटना सोमवारी (दि. २७) सकाळी सांगलीत शामरावनगरमध्ये खिलारे मंगल कार्यालयानजिक घडली.यासंदर्भात जखमी महिलेच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी हल्लेखोर महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. मुळचे विजापूर जिल्ह्यातील निढोळी येथील पती-पत्नी व त्यांचे कुटुंबिय सांगलीत माधवनगर रस्त्यावर एका अपार्टमेंटमध्ये राहते. आपला पती शामरावनगरमध्ये एका महिलेच्या घरी तिच्यासोबत राहतो अशी माहिती पत्नीला मिळाली होती. त्यामुळे ती सोमवारी सकाळी भावजयीसोबत शामरावनगरमध्ये संबंधित महिलेच्या घरी गेली. तेव्हा तिचा पती व ती महिला नको त्या स्थितीत आढळले.त्यामुळे संतापलेल्या पत्नीने संबंधित महिलेला जाब विचारला. तेव्हा त्या महिलेने तिला मारहाण सुरु केली. तिचे केस ओढले. कानातील साखळी जोराने ओढली. या घटनेत तिचा कान फाटला. ती जखमी झाली. तिच्या फिर्यादीवरुन शामरावनगरमधील महिलेविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सांगलीत पतीच्या रखेलीने केलेल्या मारहाणीत महिलेचा कान फाडला
By संतोष भिसे | Updated: May 28, 2024 16:02 IST