सांगली : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे भाजी विक्रेत्या तरुणाचा मित्रानेच धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून केला. पांडुरंग रघुनाथ कुंभार (वय ३२, रा. मारूती मंदिराजवळ, कसबे डिग्रज) असे मृताचे, तर श्रीधर ऊर्फ चेंग्या जगन्नाथ जाधव (रा. कसबे डिग्रज) असे खून करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. त्याला अटक केली आहे. उसने दिलेले दोन हजार रुपये परत मागितल्याच्या रागातून हा प्रकार घडला. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.भाजीपाला विक्रेते पांडूरंग कुंभार याचा श्रीधर जाधव हा मित्र आहे. मृत कुंभार यांनी जाधव याला काही दिवसांपुर्वी दोन हजार रूपये उसने दिले होते. हे उसने पैसे परत मागितल्याने जाधव याला राग आला. दरम्यान वादातून जाधवने कुंभार याच्यावर चाकूने पोटात वार केला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यानंतर संशयित जाधव पसार झाला होता. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत त्याला हातकणंगले येथून ताब्यात घेतले.
बेडग येथे जमिनीच्या वादातून चुलत भावाकडून भावाचा खूनजमिनीच्या वादातून बेडग (ता. मिरज) येथे बंडू शंकर खरात या शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. खुनानंतर संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. सांगली जिल्ह्यात एकापाठोपाठ एक खुनाचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.