शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

आटपाडीत हवा खमक्या पोलिस अधिकारी

By admin | Published: June 06, 2016 11:48 PM

शेलार यांची बदली : नवीन अधिकाऱ्याची प्रतीक्षा; राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हेगार मोकाट

अविनाश बाड --आटपाडी पोलिस ठाण्याचा कार्यभार गेल्या १० वर्षांत प्रथमच पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील यांच्याकडे आहे. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांची मिरज शहर पोलिस ठाण्यात बदली झाली. ते शनिवार, दि. ४ रोजीच तिथे हजर झाले. हे पोलिस ठाणे नव्या पोलिस निरीक्षकांच्या प्रतीक्षेत आहे. आटपाडीत खमक्या पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.आटपाडी हे सांगली मुख्यालयापासून सुमारे १०० किलोमीटरवर असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची या पोलिस ठाण्याला अपवादानेच भेट होते. आटपाडी म्हणजे दुष्काळी-मागास असे म्हणून एरवी येथे यायला तयार नसलेले अनेक विभागाचे अधिकारी मात्र येथील सेवा संपवून जाताना खूश झालेले असतात. पुन्हा येथे येण्यासाठी उत्सुक असतात, ही वस्तुस्थिती अनेकदा स्पष्ट झाली आहे.आटपाडी तालुक्यात अपवाद वगळता सर्वत्रच अवैध धंद्यांना कायम ऊत आलेला असतो. पोलिस ‘कारवाई’ करतात; पण पुन्हा अवैध धंदे सुरूच असतात. अवैध धंद्यांबद्दलच नव्हे, तर राजकीय दबावाखाली येऊन पोलिस अनेकदा मारामारीची कारवाई केवळ कागदोपत्री करीत असल्याने, कायद्याचा धाक न वाटल्याने पुढे मोठ्या मारामाऱ्या होत आहेत.आटपाडी पोलिसांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप ही तर अलीकडे नित्याचीच बाब ठरली आहे. अदखलपात्र गुन्हा दाखल होत असलेल्या प्रकरणातही राजकारणी हस्तक्षेप करताना दिसतात. कोणत्याही दिवशी आटपाडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधलेल्यांची चौकशी कधी केली गेली, तर अनेक पुढाऱ्यांनी संपर्क साधल्याची माहिती समोर येईल. विशेष म्हणजे एकाच संशयितासाठी अनेक पुढाऱ्यांचे म्हणणे योग्य असेल, त्यांच्या सांगण्यामुळे निष्पापावर अन्याय केला जाऊ नये, हे त्यांचे म्हणणे असेल, तर समजण्यासारखे आहे. पण अनेकदा कितीही चुकीचा वागला असला, तर कार्यकर्ता आहे म्हणून पोलिसांवर दबाव आणला जात असेल, तर येणाऱ्या काळात तालुक्यातील शांतता, सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याचीच भीती आहे. त्यामुळे हे पुढारी तालुक्याचे हित बघतात, का फक्त त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा राजकीय गट प्रबळ करण्यासाठी बेफिकिरीने वागतात, याची तालुकावासीयांनीच काळजी घेण्याची गरज आहे.गेल्या काही वर्षांत आटपाडी पोलिस ठाण्यात राजकीय दबावामुळे खोटे गुन्हे दाखल होत असल्याचीही चर्चा वारंवार रंगते. मग या पोलिस ठाण्यातील अधिकारी यावर ‘तडजोडी’चा मार्ग निवडतात. पण त्यासाठी पुढाऱ्यांच्या हातचे बाहुले बनत असल्याची वस्तुस्थिती आहे. एका पुढाऱ्याने अटक करा म्हणून दम दिला की, त्यासाठी फिर्यादीकडून आधी ‘मलिदा’ घेतात, नंतर सोडून द्या म्हणून दुसऱ्या पुढाऱ्याचा फोन आला की, पुन्हा खिसा भरून सोडून देतात, असे सर्रास बोलले जाते. यातून पोलिसांचे भरलेले खिसे लोकांना दिसत नसले तरी, लोकांसमोर कायद्याचा धाक कमी झाल्याचा वाईट संदेश पोहोचत आहे. त्यासाठी आता आटपाडी पोलिस ठाण्यात खमक्या अधिकाऱ्याची नेमणूक होणे गरजेचे आहे. चांगला अधिकारी मिळेल, अशी आटपाडी तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे. असे झाले तरच येथील गुन्हेगारीला आळा बसण्याची शक्यता आहे.राजकारणासाठी : पोलिसांचा वापरराजकारणासाठी पोलिसांचा अनेक पुढारी वापर करून घेत असल्याची चर्चा कायम होते. त्यामुळे अनेक कार्यकर्ते मारामारीनंतर आधी पोलिस ठाण्यात जाण्याऐवजी पुढाऱ्यांकडे जातात. मग सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? याच पोलिस ठाण्यात कोणत्याच पुढाऱ्याला न जुमानता कठोर कारवाई करणाऱ्या सतीश पळसदेकर, संजय पाटील या अधिकाऱ्यांची नावे ८-१० वर्षांनंतर आजही आटपाडीकरांच्या लक्षात आहेत. असे अधिकारी येथे देण्याची गरज आहे.