अमित काळे ल्ल तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात वैध ठरलेल्या २५ उमेदवारांपैकी ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या मैदानात १४ उमेदवार आहेत. पक्षीय पातळीवरील सर्व उमेदवारांचे अर्ज राहिल्याने अपेक्षेप्रमाणे सामना पंचरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे.आज (बुधवार) कोण-कोण अर्ज मागे घेणार याबाबत मतदारसंघात प्रचंड उत्सुकता होती. पक्षीय पातळीवर काहींनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. तेही मागे घेतल्याने कोणत्याच प्रमुख नेत्यांनी बंडखोरी केली असे म्हणता येणार नाही. तरीही १४ जणांनी अर्ज ठेवल्याने यावेळी उमेदवारांची संख्याही वाढल्याचे चित्र आहे. तसेच एकाच मतदान यंत्रावर सर्व उमेदवारांची नावे बसत असल्यामुळे प्रशासनातही समाधानाचे वातावरण आहे. १५ पेक्षा जास्त नावे असती, तर दुसरे मतदानयंत्र ठेवावे लागले असते.राष्ट्रवादीकडून माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, भाजपकडून माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे, काँग्रेसकडून सुरेश शेंडगे, शिवसेनेकडून महेश खराडे, तर मनसेकडून सुधाकर खाडे हे प्रमुख उमेदवार आता रिंगणात आहेत. मतदारसंघाचे मैदान स्पष्ट झाल्याने आता उमेदवारांनी राजकीय बेरजेची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे.संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आता प्रचाराला अधिकच वेग येणार आहे. यातील दोन माजी मंत्र्यांमधील राष्ट्रवादी विरुध्द भाजप ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. त्यात शिवसेना, काँग्रेस व मनसेचेही उमेदवार रिंगणात असल्याने, यात कुणाला किती मते पडतील, तिघांत विभागली गेलेली मते कोणाच्या पथ्यावर कशी पडतील, कोणामुळे कोणाची अडचण, तर कोणाचा फायदा होईल याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.सुरेश शेंडगे यांनाही चांगली मते मिळण्याची शक्यता असल्यामुळे याचा फटका राष्ट्रवादी आणि भाजपलाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथील लढत लक्षवेधी होणार आहे.आज सकाळी प्रक्रिया सुरू झाल्यापासून निवडणूक कार्यालयाच्या परिसरात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची ये-जा सुरू होती. दुपारी साधारणत: दोन वाजल्यानंतर उमेदवारांनी अर्ज माघारीची प्रक्रिया पार पडली. तीनपर्यंत मुदत असल्याने मुदतीनंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब पवार, सचिन पाटील, भिकाजी कोरे यांच्यासह आठजण अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. हे अपक्ष कुणाची मते खाणार यावर राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. तासगाव-क.म.एकूण मतदार २,६८,१५५नावपक्षआर. आर. पाटील राष्ट्रवादीअजितराव घोरपडेभाजपसुरेश शेंडगेकाँग्रेसमहेश खराडे शिवसेनासुधाकर खाडेमनसेशंकर मानेबसपसुभाष माळीअपक्षसुकुमार कांबळेअपक्षआनंदराव पवारअपक्षसंभाजी माळीअपक्षसूर्यकांत बोधलेअपक्षसचिन पाटीलअपक्ष
आबा-घोरपडेंना शेंडगेंचा धोका
By admin | Published: October 01, 2014 11:23 PM