शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

आबा-काका गट भिडणार

By admin | Published: May 29, 2017 11:19 PM

आबा-काका गट भिडणार

लोकमत न्यूज नेटवर्कतासगाव : आॅक्टोबरमध्ये तासगाव तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. गावा-गावात व भावा-भावात आबा-काका गटाचा पुन्हा संघर्ष धुमसणार आहे. मणेराजुरी, आरवडे, वायफळे, उपळावी, कुमठे, अंजनी, चिंचणी, शिरगाव या बड्या गावांचा यामध्ये समावेश आहे. भाजपने नगरपालिका ताब्यात ठेवली. मात्र सेनापतीशिवाय लढणाऱ्या राष्ट्रवादीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पालिका पराजयाचा वचपा काढला. गावोगावी मे महिन्यातील उन्हाप्रमाणे राजकीय वातावरण तापत आहे. मतदारांची किरकोळ कामे करीत ‘लक्ष राहू द्या’ असे मतदाराला सांगितले जात आहे.राजकारणासाठी तासगाव तालुका राज्यभरात संवेदनशील म्हणून ओळखला जातो. माजी मंत्री आर. आर. आबा व खा. संजयकाका यांचा जीवघेणा राजकीय संघर्ष तर कमालीचा टोकाचा होता. दोन्ही गटाचे राजकारण घरा-घरात, भावा-भावात शिरून गाव, घरे जळाली. दोन एकाच आईची पोरं राजकारणानं एकमेकांचा जीव घ्यायला उठली. आबांच्यानंतर राष्ट्रवादीची अवस्था सेनापती नसलेल्या सैन्यागत होती. बडे बडे मोहरे पक्ष सोडून काका गटात गेले. मात्र सेनापतीशिवाय आबांच्या सैन्याने बाजार समिती निवडणुकीत विजय मिळविला. नगरपालिका निवडणुकीत त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे कमळ काकांनी तासगाव नगरपालिकेवर फुलविले.मात्र त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटात जोरदार चुरस झाली. काकांनी नेतेच उचलल्याने, राष्ट्रवादीला उमेदवार मिळतो की नाही, अशी अवस्था होती. पण गावोगावी कडवी लढत होऊन, खोटा आत्मविश्वास ठेवलेल्या भाजपचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पराभव केला. राष्ट्रवादीने वादळात दिवा लावला.आता २६ ग्रामपंचायतींचा कार्यकाल डिसेंबरमध्ये संपत आहे. निवडणुकीची तयारी गावा-गावात सुरू झाली आहे. यातील बऱ्याच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सता आहे. मात्र सत्ता मिळविण्यासाठी आॅक्टोबरमध्ये तासगाव तालुक्यात आबा-काका गटाचा संघर्ष पुन्हा धुमसणार आहे.संवेदनशील गावे : राष्ट्रवादीची सत्ताचिंचणी, अंजनी, आरवडे, बलगवडे, बस्तवडे, बेंद्री, भैरववाडी, कचरेवाडी, खुजगाव, कुमठे, लिंब, मणेराजुरी, नागाव, मतकुणकी, नागेवाडी, नेहरुनगर, निमणी, पुणदी, सावर्डे, शिरगाव, उपळावी, वंजारवाडी, वासुंबे, वायफळे, योगेवाडी या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आॅक्टोबरमध्ये होणार आहेत. ही गावे राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत.