- महेंद्र किणीकर वाळवा : तालुक्यातील शिरगांव येथील सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील मानाचे श्रीफळ एक लाख एकत्तीस हजार तीनशे एकत्तीस रूपयांना सवालाच्या बोलीने शंकर बाबू आंबी यांनी घेतले. शिरगांव येथील श्री सिद्धेश्वर मंदिरातील ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सांगता झाला. परंपरेनुसार महाप्रसाद देण्यात आला.
महाप्रसादाचे वाटप केल्यानंतर शिल्लक साहित्याचे सवालाच्या बोलीने नागरिक या वस्तू खरेदी करतात. त्यातील मानाचे श्रीफळ एक लाख एकत्तीस हजार तीनशे एकत्तीस रूपयांना शंकर आंबी यांनी घेतले. कोथिंबीर पेंडी सुरेश आंबी यांनी बारा हजार रुपयांना घेतली. तांदूळ बारा हजार शंभर रुपयांना रघुनाथ आंबी यांनी घेतले. गहू कणीक बारा हजार शंभर रुपयांना भगवान हवालदार यांनी घेतले. हरभरा डाळ सात हजार रूपयांना राजाराम शिंदे यांनी घेतले. सुट्टे नारळ दहा हजार रूपयांस विठ्ठल चौगुले यांनी घेतले. तेल डबे एकवीस हजार रुपयेस वसंत पवार यांनी घेतले.
गहू कोंडा दहा हजार रूपयांना बापू सांभारे यांनी घेतला. चटणी सौदा पंधरा हजार सहाशे रुपयांना संपत पाटील यांनी घेतला. भाजीपाला दोन हजार शंभर रुपयांना गजानन पाटील यांनी घेतला. द्रोण पत्रावळी पाच हजार सातशे रुपयांना मारूती आंबी यांनी घेतले. दोरी दहा हजार रूपयांना प्रकाश पवार यांनी घेतले. दुधाची साय एक हजार चारशे रुपयांना गणपती चव्हाण यांनी घेतली. जळण नऊ हजार रूपयांस प्रकाश पवार यांनी घेतले. साखर पावडर चार हजार सहाशे रुपयेस धनाजी पवार यांनी घेतले.