इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील एका गावातून इस्लामपूर शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याची फिर्याद मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात दिली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
अपहरण झालेली मुलगी व तिची बहीण अशा दोघी शाळेसाठी सोमवारी सकाळी साडेसातला घरातून निघाल्या. शाळेच्या वेळेत अपहरण झालेली मुलगी वही घेऊन येते, असे सांगून शाळेतून बाहेर पडली होती. शाळा सुटल्यावर तिच्या बहिणीने वर्गात जाऊन पाहिले असता, ती तिथे नव्हती. तिची वाट बघून बहीण घरी परतली. त्यानंतर पालकांनी शाळेमध्ये चौकशी करत बसस्थानक परिसर, मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली असता, तिचा शोध लागला नाही. त्यामुळे या अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञाताने कशाची तरी फूस लावून तिचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.