शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

आबांच्या विचारांचे लोक आमच्यासोबतच

By admin | Published: October 19, 2015 11:04 PM

स्मिता पाटील : स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांना त्यांची जागा कळेल

प्रवीण पाटील - सावळज--तासगाव - कवठेमहांकाळमध्ये वैयक्तिक स्वार्थासाठी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला; मात्र तासगाव-कवठेमहांकाळमधील आर. आर. पाटील आबांच्या विचारांवर प्रेम करणारी जनता आमच्याबरोबर आहे. आबांच्या जिवावर जे मोठे झाले व जे आज फक्त स्वार्थापोटी पक्ष बदलत आहेत, त्यांना येणाऱ्या काळात सूज्ञ जनताच त्यांची जागा दाखवून देईल. तासगाव बाजार समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जो इतिहास घडवला, त्याचीच पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये होईल, असा विश्वास आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.गेल्या काही दिवसांपासून तासगाव-कवठेमहांकाळमध्ये अनेक राजकीय उलथापालथी होत आहेत. तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात होते; मात्र स्मिता पाटील यांनी स्वार्थासाठी पक्ष बदललेल्यांचा खरपूस समाचार घेतला. दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची होत असलेली ससेहोलपट बघून प्रत्येक क्षणाला आबांची उणीव भासते. सध्याचे सरकार भांडवलदार, उद्योगपतींचे सरकार असून, गोरगरीब शेतकऱ्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सोडाच; पण आबांच्या काळात पूर्ण झालेल्या पाणी योजनाही सध्याच्या सरकारच्या कुचकामी धोरणामुळे बंद पडण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी व भांडवलदारांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, मात्र शेतकऱ्यांना व गोरगरिबांना अच्छे दिन कधी येणार? असा सवाल स्मिता पाटील यांनी केला. आबांचे सर्व सहकारी, आ. सुमनताई पाटील व सुरेशभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढच्या काळात काम करू, असा विश्वास स्मिता पाटील यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी कोणतीही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क करावा, आम्ही त्यांच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहोत असेही त्या म्हणाल्या.मी, सुरेशभाऊ सुमनतार्इंचे कार्यकर्तेआबांच्यानंतर आमच्या कुटुंबातील तिहेरी नेतृत्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र मी व सुरेशभाऊ दोघेही सुमनतार्इंचे कार्यकर्ते म्हणूनच काम करीत असून, आमच्यातील मतभेदाच्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. येणाऱ्या काळातही तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले जातील, असे स्मिता पाटील यांनी स्पष्ट केले.कार्यकर्त्यांना बळ देणारआबासाहेबांच्या अकाली जाण्याचे दु:ख, संकट व जबाबदाऱ्या या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे, गेले आठ महिने यातून सावरण्यात गेले. मात्र यापुढे शंभर टक्के राजकारणात सक्रिय राहून कार्यकर्त्यांना बळ देऊ, असा विश्वास स्मिता पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.