शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
2
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
3
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
4
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
5
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
6
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
7
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
8
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
9
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
10
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
11
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
12
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
13
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
14
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
15
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
16
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
17
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
18
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
20
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान

अबब... घरगुती विजेचे बिल दीड लाख रुपये!

By admin | Published: December 13, 2015 11:16 PM

शिराळ्यातील प्रकार : दुरुस्तीनंतरही ४६ हजार रुपये माथी

विकास शहा--शिराळा तालुक्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाने हैराण झाला असतानाच, वीज वितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांना आता बिलाचा झटका बसत आहे. वीज कंपनीने एका शेतकऱ्याला घरगुती वापरापोटी हजार, दोन हजार नव्हे, तर तब्बल दीड लाख रुपयांचे वीजबिल दिले आहे. येथील महादेव ज्ञानू नलवडे (रा. शिराळा) हे सामान्य कुटुंबातील शेतकरी आहेत. त्यांच्या घरामध्ये चार ट्यूब, टीव्ही व फ्रीज ही उपकरणे आहेत. त्यांचा आजअखेर वीज वापर ६० युनिटच्या घरातच आहे. मात्र नाव्हेंबर २०१५ च्या बिलामध्ये ९१५१ युनिट आणि त्याचे बिल १ लाख ४६ हजार ७८० रुपये आले आहे. सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याने एवढ्या बिलाची रक्कम आणायची कुठून?, असा सवाल नलवडे करीत आहेत. हे बिल वीज वितरणकडून दुरुस्त करुन घेतले, पण ४६ हजार ५४० रुपयांपर्यंतच कमी करून देण्यात आले आहे. परंतु एवढीसुद्धा रक्कम आणणार कुठून?, हाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मीटरचा दोष असेल तर मीटर बदलण्याची जबाबदारी कंपनीची आहे. पांडुरंग महादेव नांगरे यांचे २४ हजार ५१०, तर दिलीप रघुनाथ नलवडे यांचे २४ हजार तीनशे, अशी एक महिन्याची बिले देण्यात आली आहेत. कंपनीमार्फत चुक ीची बिल आकारणी करून ग्राहकांना का वेठीस धरले जात आहे? जर मीटरमध्ये दोष असेल तर, कंपनीने ही मीटर बदलणे गरजेचे आहे. मात्र ग्राहकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. टेस्ट रिपोर्टसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. यापासून सुटका होणार, की वीज बिलासाठी आम्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची? असा सवाल शेतकऱ्यांकडून प्रशासनाला विचारला जात आहे. ग्राहकांनाच मिळतो सल्ला...कंपनीमार्फत मीटरचे छायाचित्र काढले जाते. हे छायाचित्र या बिलावर छापलेही जाते. मात्र मीटरचा दोष आहे की छपाईचा दोष आहे, याचीही तपासणी केली जात नाही. आहे त्याच परिस्थितीत बिल वितरित केले जाते. बिलामध्ये काही चुका असल्या, तर ग्राहकाला कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात. यावेळी अधिकारीवर्ग उपस्थित असले तर ठीक, नाही तर पुन्हा हेलपाटे मारण्याशिवाय पर्याय नसतो. बिलामधील दुरुस्ती दाखवली तरी, अधिकारी मात्र आहे ते बिल भरा,नंतरच्या बिलामध्ये बघून घेऊ, असा सल्ला देतात.