कुपवाड : महाराष्ट्रातील कृषी व कृषी उत्पादनावर आधारित उद्योगांसह इतर उद्योगांसाठी आफ्रिकन देशात मुबलक सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. उद्योजकांसाठी या देशाने अक्षरश: रेड कारपेट अंथरले आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर या ठिकाणी २६ ते २८ सप्टेंबर रोजी आफ्रिकन देशातील राजदूत, उद्योजकांची बैठक आयोजित केली आहे. या ठिकाणी प्रदर्शन आणि चर्चासत्रही आयोजित केले आहे, असे प्रतिपादन सूक्ष्म, लघू तथा मध्यम उद्योग मंत्रालय विभागाचे संचालक विजयकुमार एस. यांनी केले.कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ इंडस्ट्रीज अॅन्ड कॉमर्सच्या सभागृहात आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष पांडुरंग रूपनर, रमेश आरवाडे, चंद्रकांत पाटील, शिवाजीराव पाटील, संचालक हरिभाऊ गुरव, अनंतकीर्ती चिमड, रतिलाल पटेल उपस्थित होते. यावेळी विजयकुमार म्हणाले की, आफिकन खंडातील इजिप्त, सुदान, दक्षिण आफ्रिका, अल्जेरिया आदींसह ५४ देशात उद्योग उभारणीसाठी मंत्रालयाच्या माध्यमातून आवाहन केले आहे. पांडुरंग रूपनर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. यावेळी उद्योजक प्रकाश शहा, निखिल पाटील, सदाशिव साखरे, आर. डी. जाधव, मनोज झंवर, नितीन बस्तवडे, व्ही. व्ही. भिडे, अर्चना पवार, आबा पाटील, सुधीर पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
आफ्रिकेत उद्योजकांना मुबलक सोयी
By admin | Published: September 20, 2016 10:58 PM