विकास शहाशिराळा: सांगली जिल्ह्यामध्ये जानेवारी २०२५ अखेर २८४ शेतकऱ्यांनी ३९९ एकर क्षेत्रावर १,४५,४०० अंडीपुंजाचे कीटक संगोपन करून ८१,७३५ किलो कोषाचे उत्पादन केले आहे. तसेच सन २०२३-२४ मध्ये १,६१,१५० अंडीपुंजाचे कीटक संगोपन करून १,०९,७८५ किलो कोष उत्पादन झाले आहे. २०२५-२६ सालाकरिता २०० एकर नवीन तुती लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.जिल्ह्यात आजअखेर ३९३ शेतकरी ४४३ एकरावर तुती लागवडीचे क्षेत्र असून तासगाव, खानापूर, जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज या तालुक्यात लागवड झालेली आहे.केंद्र शासनाकडून अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योगाच्या तुती लागवड व रेशीम कीटक संगोपनगृह बांधकामासाठी त्रैवार्षिक रु.४,१८,८१५ रकमेचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २७४ शेतकरी २७४ एकर इतक्या क्षेत्रात मनरेगाचा लाभ घेत आहेत.
तसेच ५ एकरवरील क्षेत्र धारण करीत असणाऱ्या लाभार्थींकरिता सन २०२२-२३ पासून केंद्र व राज्य शासन यांच्या सहभागाने सिल्क समग्र २ ही योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत ११९ शेतकरी १६९ एकर क्षेत्रावर या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेमध्ये एक एकर क्षेत्र व दोन एकर क्षेत्र तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता अनुदान देण्यात येते.सन २०२४-२५ सांगली जिल्ह्यामध्ये माहे जानेवारी २०२५ अखेर २८४ शेतकऱ्यांनी ३९९ एकर क्षेत्रावर १४५४०० अंडीपुंजाचे कीटक संगोपन करून ८१७३५ किलो कोषाचे उत्पादन केले.तसेच सन २०२३-२४ मध्ये १६११५० अंडीपुंजाचे कीटक संगोपन करून १०९७८५ कि.ग्रॅ. कोष उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वांत मोठे ८०० ॲन्ड ॲटोमॅटीक रिलॉग युनिट आरएसएम सिल्क, कवठेएकंद (ता. तासगाव) येथे सन २०१९ पासून कार्यान्वित आहे. वर्षाला २४० मे.टन कोषावर प्रक्रिया करून रेशीम सूत उत्पादन करण्याची क्षमता आहे.
शासकीय अनुदान व कोषाला मिळणारा चांगला दर यामुळे शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याकरिता जिल्हा रेशीम कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. - रमेश कांबळे, रेशीम विकास अधिकारी श्रेणी-१ अतिरिक्त कार्यभार