आज मुंबईत दसरा मेळावा होणार आहे. यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. दरम्यान, सांगलीतून एक मोठी मोठी बातमी समोर आली आहे. मेळाव्यासाठी येत असलेल्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
...तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
मिळालेली माहिती अशी, रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातून जात असताना हा अपघात झाला. एका ट्रकने पाठिमागून कारला धडक दिली. यामुळे हा अपघात झाला. या कारमध्ये युवा सेनेचे पदाधिकारी होते, अशी माहिती समोर आली आहे.
आज मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचाही दसरा मेळावा होणार आहे. यासाठी दोन्ही गटाकडून मोठी तयारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने आझाद मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.तर ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थ मैदानावर होणार आहे.
दसरा सण आणि मुंबईमध्ये होणारे शिवसेनेचे दोन दसरा मेळावे यात मुंबईची कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झाले आहेत. आज मुंबईत दसरा मेळाव्यासाठी तब्बल ६ अतिरिक्त आयुक्त, १६ डीसीपी, ४६ एसीपी, २४९३ पोलीस निरीक्षक, १२४४९ पोलीस शिपाईंसह ३३ एसआरपीएफ क्यूआरटी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.