सांगली : महापालिका क्षेत्रात टास्क फोर्सने मंगळवारी कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३० जणांवर कारवाई करीत चार हजाराचा दंड वसूल केला. हे सर्वजण विनामास्क फिरत असताना आढळून आले.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिका क्षेत्रात मात्र अनेक नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत होते. यामुळे नियम तोडणाऱ्या आणि विशेष करून मास्क न वापरणाऱ्यावर कारवाईचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी टास्क फोर्सला दिले होते. यानुसार टास्क फोर्सकडून कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जात आहे. मंगळवारी दिवसभरात महापालिकांक्षेत्रात टास्क फोर्सने विनामास्क ३० जणांवर कारवाई करीत चार हजारांचा दंड वसूल केला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.