बलगवडे बसस्थानक परिसरात राजरोसपणे दारू विक्री सुरू असते. याठिकाणी सतत दारू पिऊन तळीराम फिरत असतात. याचा महिलांना त्रास होत असतो. संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. पण बलगवडे ढाब्यावर लोक दारू खरेदी करत असतात. हे सर्व ढाबे मुख्य रस्त्यावर आहेत. तेथून सतत पोलीस ये-जा करत असतात. पण दारू विक्रीवर कधी कारवाई होत नाही. पकडलेली दारू कमांडोनी ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन ठेवली आहे.
आठ दिवसांपूर्वी डोर्ली येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडले. पण त्याच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे अवैध धंदे कोरोना काळात राजरोसपणे सुरू आहेत. याचा सूत्रधार कोण, असा सवाल नागरिक करीत आहेत.
फोटो ओळ :
बलगवडे, ता. तासगाव येथे अवैध दारूसहित मुद्देमाल जप्त करताना.