बंडू वाघमारे याने वाढदिवसानिमित्त संभाजी चौक ते जयहिंद चौकदरम्यान दोन चारचाकी वाहनांसह ५० ते ६० मोटारसायकलींसमवेत जत शहरातील मटण मार्केटमार्गे रॅली काढली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजी व पुंगळी काढलेल्या मोटारसायकलींचे हॉर्न वाजवून आरडाओरडा करीत दुचाकी मोटारसायकल रॅली काढण्यात येत होती. या रॅलीची पोलिसांकडून रीतसर परवानगी घेण्यात आली नव्हती. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळावर जाऊन रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला;. परंतु बंडू वाघमारे वगळता इतर सर्व तरुणांनी मोटारसायकल जाग्यावर सोडून पलायन केले. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या काही तरुणांना पोलिसांनी मारहाण केली. रात्री उशिरा या संदर्भात रामेश्वर पाटील यांनी जत पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
चाैकट
पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
मोटारसायकल रॅली काढण्यापूर्वी पोलिसांनी या तरुणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांनी पोलिसांचे काहीच ऐकून न घेता मोटारसायकल रॅली काढली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.