सांगली : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या गणपती पेठ शाखेतील कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सोमवारी महापालिकेने या शाखेचा ताबा घेत सील ठोकले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली आता पुढील 14 दिवस ही शाखा बंद राहणार आहे.
शहरातील विजयनगर परिसरातील एका व्यक्तीला मिरज शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव आल्याने शहरात खळबळ माजली होती. ही व्यक्ती इचलकरंजी जनता बँक कामात होती रविवारी सायंकाळी उपचार सुरू असताना त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.महापालिकेने बँकेचे निर्जंतुकीकरण केले होते सोमवारी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानेही बँक सील करण्यात आली. अतिक्रमण विभाग प्रमुख दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि प्रणिल माने यांनी पीपई कीटसह पूर्ण बँकेची तपासणी केली.
यामध्ये काही ग्राहकांची माहिती महापालिकेला मिळाली होती. त्यानंतर ती बँक सील करण्यात आली. खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढील 14 दिवस बँक बंद ठेवण्याबाबतची नोटिसही बँकेच्या प्रवेशद्वारावर चिटकवण्यात आली आहे.सीसीटीव्ही फुटेज ताब्यात बँक सील करण्यापूर्वी महापालिकेच्या पथकाने बँकेतील 8 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीमधील सीसीटीव्ही फुटेजचा डिव्हीआर सुद्धा ताब्यात घेतला आहे. या सीसीटीव्ही फुटेजवरून या बँकेत दैनंदिन कामकाज करणारे आणि अन्य नियमित ग्राहक यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे आयुक्त कापडनीस यांनी सांगितले.2 अ३३ंूँेील्ल३२