शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख वीज ग्राहकांकडे २५ कोटींवर थकबाकी, महावितरणकडून कारवाईच्या नोटिसा 

By अशोक डोंबाळे | Published: August 29, 2023 12:47 PM

जिल्ह्यातील २९५३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

सांगली : जिल्ह्यातील १ लाख ८४ हजार १२७ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे २४ कोटी ९५ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थकीत वीज ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. सध्या महावितरणकडून २ हजार ९५३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक असे ६ लाख ५७ हजार एकूण वीज ग्राहकांची संख्या आहे. यापैकी १ लाख ८४ हजार १२७ वीज ग्राहकांकडे २४ कोटी ९५ लाख रुपयांची वीज बिलांची थकबाकी आहे. जिल्ह्यात घरगुती १ लाख ६७ हजार ८०७ ग्राहकांकडे १८ कोटी ७८ लाख रुपये, वाणिज्यिक १४ हजार ३७१ ग्राहकांकडे ३ कोटी ९० लाख रुपये आणि औद्योगिक १ हजार ९४९ ग्राहकांकडे १ कोटी ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे.

त्यामुळे गेल्या २५ दिवसात दोन हजार ९५३ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. वीजग्राहकांनी थकित बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून केले आहे.

शनिवारी, रविवारीही वीजबिल भरणा केंद्र सुरुवीजग्राहकांना चालू व थकित वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी व रविवारी कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीज बिल थकित असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

अनधिकृत वीज जोडणी केल्यास कारवाईमहावितरणच्या धडक मोहिमेमध्ये वीजपुरवठा खंडित केलेल्या थकबाकीदारांच्या वीज जोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. थकबाकीदाराने शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून केबलद्वारे विजेचा वापर असल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करणार आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीelectricityवीजmahavitaranमहावितरण