संजयनगर : लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर संजयनगर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ९० जणांवर कारवाई करून सुमारे ४० हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. २७ वाहने जप्त करण्यात आली. १२ दुकानांवर खटले दाखल केले आहेत. नागरिकांनी शासनाचे नियम न पाळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी दिला आहे.
संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माधवनगर, अहिल्यादेवी होळकर चौक, लक्ष्मीनगर येथील काही दुकाने उघडण्यात आली होती. अशा १२ दुकानांवर खटले दाखल करण्यात आले. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या सुमारे ९० जणांवर कारवाई करून ४० हजार ४०० रुपये दंड वसूल केला. २७ वाहने जप्त करण्यात आली. नागरिकांनी नियमांचे काटेकाेरपणे पालन करावे अन्यथा कडक कारवाई करू, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील यांनी दिला आहे.