शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 2:10 PM

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिले रक्ताने पत्र

आष्टा : इस्लामपूरचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांना विधान परिषदेवर संधी मिळाली पाहिजे. यासाठी आष्टा येथील भाजपचे कार्यकर्ते व भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण माने यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना रक्ताने पत्र लिहिले आहे.निशिकांत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा विचार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर शहरासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विकास कामे केली आहेत. भविष्यातील देशाचे धोरण इस्लामपूर विधानसभा मतदार संघासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी निशिकांत पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत.सर्वसामान्य जनतेत यांनी आपल्या कर्तृत्वातून एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. इस्लामपूर विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली असून राजकीय सामाजिक कार्य करीत असताना विरोधकांकडून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार घडत आहेत. भाजप पक्ष वाढविण्यासाठी त्याना विधान परिषदेवर काम करण्याची संधी मिळावी, अशी मागणीही प्रवीण माने यांनी केली आहे. त्यांनी रक्ताने पत्र लिहिल्याने हे पत्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकVidhan Parishadविधान परिषदBJPभाजपा