शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

म्हमद्याचा बुरखा घालून पोलिसांना चकवा

By admin | Published: November 15, 2015 1:10 AM

शंभर फुटांवर पोलीस असूनही आईला भेटला

सांगली : येथील अभयनगरमधील गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याच्या खुनातील मुख्य संशयित गुंड म्हमद्या नदाफ याने गुरुवारी रात्री पुन्हा एकदा पोलिसांना चकवा दिला. माने व म्हमद्या यांच्या घरामध्ये केवळ शंभर फुटांचे अंतर आहे. खून झाल्यापासून मनोजच्या घराजवळ शस्त्रधारी दहा पोलिसांचा कडा पहारा सुरू आहे. असे असताना म्हमद्याने बुरखा घालून आईची भेट घेतली. पत्नी दिलशाद हिला पोलिसांनी सोडले की नाही, याची चौकशी करून रात्री बारा वाजता तो घरातून निघून गेला. त्याच्या या ‘धाडसा’मुळे पोलिसांचे नाक कापले गेले आहे. आर्थिक वाद, खंडणीची तक्रार या कारणावरून म्हमद्या व त्याच्या साथीदारांनी सोमवारी (दि. ९) रात्री मनोजचे अपहरण करून खून केला होता. याप्रकरणी आतापर्यंत आठजणांना अटक केली आहे. यामध्ये म्हमद्याच्या पत्नीचाही समावेश आहे. म्हमद्याच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असले तरी, त्यांना अद्याप यश आलेले नाही. मनोजचा खून झाल्यापासून त्याच्या कुटुंबास पोलीस संरक्षण दिले आहे. एक पोलीस उपअधीक्षक व नऊ कर्मचारी शस्त्रधारी ताफा मनोजच्या घराबाहेर थांबून आहे. मनोजच्या घरापासून शंभर फूट अंतरावर म्हमद्याचे घर आहे. त्याच्या घरात सध्या केवळ त्याची आई आहे. त्याचा भाऊ शंभरफुटी रस्त्यावर राहतो. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता म्हमद्या बुरखा घालून स्वत:च्या घरी गेला. त्याने दरवाजा आतून बंद करून घेतला. घरी तो अर्धा तास होता. त्याने पत्नी दिलशादबाबत चौकशी केली. तिला अटक केल्याचे समजल्यानंतर म्हमद्या बुरखा घालूनच घरातून बाहेर पडला. पोलिसांना त्याच्याबद्दल जराही संशय आला नाही. म्हमद्या बुरखा घालून आईला भेटून गेल्याचे समजताच पोलिसांना धक्का बसला. जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी, अतिरिक्त पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने संपूर्ण शहरात नाकाबंदी व ‘कोम्बिंग आॅपरेशन’ मोहीम राबविली. धार्मिक स्थळांची तपासणी केली. पहाटे चारपर्यंत म्हमद्याचा शोध सुरू होता. मानेच्या घराजवळ बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फैलावर घेतले. म्हमद्या पुन्हा येऊ शकतो, असा अंदाज बांधून आता म्हमद्याच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गल्ली-बोळांत पोलीस नियुक्त केले आहेत. त्याच्या घरावर व तसेच आईवरही ‘वॉच’ ठेवण्यात आला आहे. (प्रतिनिधी) आई ताब्यात पोलिसांनी म्हमद्याच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी केली. तिनेही म्हमद्या बुरखा घालून भेटायला आला होता, त्याने पत्नीची चौकशी केली, असे सांगितले. म्हमद्या कोठे आश्रयाला जाऊ शकतो, याबद्दल पोलिसांनी तिच्याकडे कसून चौकशी केली. तथापि चौकशीला तिने फारसा प्रतिसाद दिला नाही. पोलिसांना महागात पडले मनोजचा मित्र भरत फोंडे याने म्हमद्या व त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी मनोजला सरकारी साक्षीदार केले होते. म्हमद्याच्या तीन साथीदारांना तातडीने अटक केली. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे तो शहरात खुलेआम फिरत होता, अशी चर्चा आता रंगली आहे. या काळात त्याने मनोजच्या खुनाचा कट रचला. पोलिसांनी वेळीच त्याला अटक केली असती, तर मनोजचा प्राण वाचला असता. खुनानंतर पोलीस आता त्याच्या शोधासाठी दिवस-रात्र एक करीत आहेत. खंडणीचे हे प्रकरण पोलिसांना चांगलेच महागात पडल्याचे दिसू लागले आहे.