सातारा : ‘येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर दि. २३ ते २७ फेबु्रवारीदरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात देशातील नामवंत कंपन्यांचे ३०० हून अधिक स्टॉलचा सहभाग राहणार आहे.
सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत आयोजित केलेल्या या प्रदर्शनात शेतीविषयक प्रक्रिया उद्योग, राज्य शासन कृषी विभागाच्या, शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने, पशुपक्षी प्रदर्शन, डॉग शो, दुर्र्मीळ देशी ५०० हून बियाण्यांचे प्रदर्शन व विक्री, तांदूळ महोत्सव, परदेशी भाजीपाला प्रदर्शन, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन, ३ लाखांहून अधिक शेतकरी बांधवांची प्रदर्शनास भेट, तज्ज्ञ मान्यवरांची व्याख्याने, नवीन तंत्रज्ञान, पीक स्पर्धा, राजधानी कृषी पुरस्कार, सौरऊर्जा विषयक दालने, खास आकर्षण, देशातील सर्वांत मोठा १५० किलोचा पंजाबी बोकड पाहण्याची संधी मिळनार आहे.
जगातील सर्वात लांब १५ इंच लांब गव्हाची लोंबी व १४० ते १५० दाणे तयार होणारी कुदरत १०० व ८ इंच लांबीची लोंबी कुदरत १७ ही देशी बियाणे आदी माहिती व प्रदर्शन, सेंद्रिय शेतीसाठी विशेष मार्गदर्शन देणारी दालने, गोड्या पाण्यात मोत्यांची शेती संदर्भात माहिती, शेतकºयांना त्यांच्या शेतीमाल, बियाणे विक्रीसाठी मोफत स्टॉल, जगातील सर्वांत लांब एक फूट लांबीची देशी मिरची, खास आकर्षण एक टन वजनाची गाडी ओढणारा जगातील सर्वात आक्रमक श्वान व गाडी ओढण्याचे प्रात्यक्षिक, फळे व फुले प्रदर्शन व स्पर्धा, गायी, म्हशी व बैल प्रदर्शन व स्पर्धा, माकड पळवून लावणारे लहान यंत्र, सर्पविषयक माहिती देणारे चित्र प्रदर्शन, देशी गायीच्या गोमुत्रापासून २० रुपयांपासून २०,००० लिटरपर्यंतच्या घरच्या घरी औषध बनविण्याची प्रक्रिया उद्योगाची माहिती, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन आदींचा सहभाग असणार आहे.कुत्रा, बोकड ठरणार प्रदर्शनाचे मुख्य आकर्षकदुसरे राजधानी भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात दि. २५ फेब्रुवारी रोजी भव्य डॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच एक टन वजनाची गाडी ओढणारा कुत्रा व दीडशे किलोचा बोकड हे या कृषी प्रदर्शनाचे विशेष आकर्षण राहणार आहेत. हे प्रदर्शन मागील वर्षीप्रमाणेच याहीवर्षी सातारा जिल्हावासीयांची गर्दी खेचणारे ठरेल, असेही सोमनाथ शेटे यांनी सांगितले.