सांगली : लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी प्रशासनाने मोहीम राबविली आहे. त्यानुसार मतदान केंद्राची निर्मिती करताना त्याठिकाणी किती मतदार आहेत, यापेक्षा तेथील प्रत्येक मतदाराला मतदान करता येईल, यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. कमी मतदार असले तरी त्याठिकाणी आवश्यक यंत्रणा राबविण्यात येणार आहेच.या मतदान केंद्रात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, स्थानिक मतदारांना सुविधा तेथेच मतदान करता येणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्वच भागात कमी मतदार असलेली मतदान केंद्रे आहेत. जत, आटपाडी तालुक्यात अशी केंद्रे आहेत.काय आहे प्रशासनाचे नियोजन...सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, तर यात जत व आटपाडी तालुक्यातील काही गावे व वाड्या वस्त्या या दळणवळणाच्यादृष्टीने अडचणीच्या आहेत. या दोन तालुक्यांबरोबरच इतरही तालुक्यात कमी मतदारसंख्या व वाहतुकीसाठीही अडचणीचा भाग आहे. कमी मतदार असलेल्या मतदान केंद्रांची माहिती घेतली असता, जत तालुक्यातील शेड्याळ या गावात सर्वाधिक कमी ३५० मतदार आहेत. जतपासून ४५ किलोमीटरवर असलेल्या शेड्याळला पाच्छापूरमार्गे जावे लागते. तालुक्यात सध्या दुष्काळाचे भयाण स्वरूप असल्याने या गावातही टंचाई परिस्थिती आहेच. अडचणी असतानाही या गावात इतक्या मतदारांसाठीही यंत्रणा उभारली आहे. केंद्र क्रमांक ७८ म्हणून या मतदान केंद्राची नोंद आहे. सुविधा मिळण्यास अडचणी असल्या तरी, मतदानास प्राधान्य दिले जात आहे.
Lok Sabha Election 2019 साडेतीनशे मतांसाठीही यंदा प्रशासनाची तयारी; शेड्याळ गावात कमी मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:28 PM