सांगली : सांगली शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असताना प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे. सर्वांनी समन्वयाने कोविड डिटेक्शन सेंटर उभारणी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्या, आॅक्सिजनची निर्मिती, तातडीच्या चाचण्या, सौम्य बाधीतांवर घरीच उपचार केले तर कोरोनाला रोखू शकतो, असा विश्?वास माजी नगरसेवक शेखर माने यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे व्यक्त केला.निवेदनात माने यांनी म्हटले आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, पोलिस व नागरिक यांच्यात योग्य समन्वय नाही. त्यामुळे एकत्रित काम होताना दिसत नाही. त्यातून रुग्ण वाढताहेत, हॉस्पिटल व बेड मिळत नाहीत. तोपर्यंत रुग्ण दगावत आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम केले पाहिजे. शववाहिकाही काही वेळा १२-१२ तास मिळत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांचे हाल मृत्यूनंतर सुरूच आहेत.सांगलीत मध्यवर्ती ठिकाणी एखादे कार्यालय ताब्यात घेऊन तिथे कोविड डिटेक्शन सेंटर उभारले पाहिजे. यातून गंभीर रुग्णांना बेड मिळून त्यांच्यावर तातडीने उपचार होतील. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचतील. आज रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांत घबराट आहे. नाहक भीतीपोटी ते हॉस्पिटल, डॉक्टरना शोधत आहेत. त्यांना या सेंटरमध्ये योग्य मार्गदर्शन होऊ शकेल.सर्व सरकारी इस्पितळांत आॅक्सिजनचा पुरवठा वेळेवर होत नाही. सध्या आपल्याकडे पुण्याहून आॅक्सिजन येतो. त्यामध्ये वेळ जातो व गंभीर रुग्ण दगावतात. त्यासाठी कोल्हापूरप्रमाणे येथेही आॅक्सिजनचा प्लॅट तातडीने उभारला पाहिजे. जेणेकरून आॅक्सिजन अभावी रूग्ण दगावणार नाहीत. प्रशासनाने डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरू करण्यापूर्वी सर्व स्टाफ व यंत्रणा अगोदर उभी करावी. त्यानंतरच हॉस्पिटल सुरू करावे. केवळ हॉस्पिटल उदघाटनाची घाई उपयोगाची नाही. त्यामुळे लोकांतील गोंधळ वाढतोच आहे.जनतेमध्येही आता पुन्हा जागृती करण्याची गरज आले. लोक निष्कारण फिरत आहेत. गणेशोत्सव कालावधीत मोठी गर्दी बाजारात झाली होती. आता यापुढे सारे सण उत्सव आहेत. त्यामुळे मास्क लावणे, दोन व्यक्तित अंतर ठेवणे, जोखीम व्यक्तिनी स्वत:ला सुरक्षित ठेवावे. गदीर्चे कार्यक्रम आयोजित करू नयेत. याबाबत सतर्कतेचे आवाहन करून त्याबाबत उपाययोजना कराव्यात.
सांगली जिल्ह्यात प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत : शेखर माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 3:37 PM
सांगली शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असताना प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे. सर्वांनी समन्वयाने कोविड डिटेक्शन सेंटर उभारणी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्या, आॅक्सिजनची निर्मिती, तातडीच्या चाचण्या, सौम्य बाधीतांवर घरीच उपचार केले तर कोरोनाला रोखू शकतो, असा विश्?वास माजी नगरसेवक शेखर माने यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे व्यक्त केला.
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत : शेखर मानेउपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करा