मिरज : कोरोनासाथीच्या काळात पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणे शक्य नसल्याने मिरजेत महिलांनी लेझीम योगा व नृत्याविष्काराद्धारे विठ्ठलाची आराधना केली. कल्पतरू कॉलनीत ओम साई योगा क्लासेसच्या संचालिका मीनाक्षी फडके यांच्यासह गौरी भोईटे, दीपाली जाधव, डॉ. अश्विनी कोळेकर, डॉ. अपर्णा पुजारी, मेघा शिंदे, स्नेहा मूलचंदानी, अंजली पाटील, आरती आचार्य, संगीता डोंगरे यांनी नृत्य सादर केले. यावेळी मंदार भोईटे यांनी पांडुरंग व डॉ. मयूरी फडके रुक्मिणीच्या भूमिकेत होते. कोरोनाच्या काळात महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी नियमित योगासने व नृत्याचा उपयोग होतो. योगासनांमुळे ऑक्सिजनची पातळी वाढून, मन प्रफुल्लित होते, असे मीनाक्षी फडके यांनी यावेळी सांगितले. न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मिलिंद अग्रवाल व रेवती फडके यांनी संयोजन केले.
मिरजेत लेझीम व योगाद्धारे महिलांची विठ्ठलाची आराधना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 4:19 AM