शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

सांगलीतील घरात ऐश्वर्य पाहिले, विश्वासघातही सोसला; बालपणीच्या वेदना मनात खोलवर रुजल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 7:59 AM

मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. 

अविनाश कोळी - सांगली : नाट्यसंवाद, नाट्यगीतांचा बहर, शास्त्रीय संगीताच्या मैफिलींच्या सुवर्णकाळातून बरसलेली सधनता अनुभवत दीदींचे सांगलीत बालपण बहरले. पण या वाटेवर वेदनांच्या काटेरी प्रवासाने घायाळ होण्याचा अनुभवही याच सांगलीत आला. हेच अनुभव त्यांच्या मनात खोलवर कोरले गेले ते कायमचेच.एस.टी. स्टँडजवळ कोटणीस महाराजांच्या मठासमोर मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी प्रशस्त घर घेतले होते.  मंगेशकर कुटुंबीय वरच्या मजल्यावर आणि तळमजल्यावर त्यांचे गणूमामा म्हणजे मास्टर अविनाश ऊर्फ गणपतराव मोहिते राहायचे. इथे प्रतिष्ठित, विद्वान व गुणवंत मंडळींची कलाकारांची ऊठबस असे. याच घरात लतादीदींसह आशा, उषा, मीना, हृदयनाथ या भावंडांचे बालपण गेले. दीदींचा जन्म इंदूर येथे झाला असला तरी नंतर मंगेशकर कुटुंबीय सांगलीत आले व स्थिरावले. याच ठिकाणी लता मंगेशकरांवर संगीत व नाट्यसंस्कार झाले. याच ठिकाणी घरात त्यांनी अनेक नाटकांचे खेळ म्हणून सराव केले आणि परिणामी त्यांना नाटकात अभिनयाची संधीही मिळाली.

वैभवसंपन्न कुटुंबाची फरफट - मास्टर दीनानाथांची मुले म्हणून सांगलीत भावंडांना मानसन्मान मिळाला. १९३५ ते १९४० हा त्यांचा सांगलीतील काळ संमिश्र अनुभवांचा राहिला. ज्या सांगलीत त्यांनी आनंद, समृद्धी, मैत्री, नात्यांचा गोडवा, व्यावसायिक यश अनुभवले, त्याच सांगलीत त्यांना यातनादायी अनुभवही आले. मास्टर दीनानाथ यांची बलवंत नाटक मंडळी आर्थिक संकटात सापडल्यानंतर या कुटुंबाची फरफट सुरू झाली. त्यातून सावरण्यासाठी दीनानाथांनी बलवंत पिक्चर्स काॅर्पोरेशन या नावाची सिनेमा कंपनी उभारली. 

या कंपनीलाही अपयश आले आणि आर्थिक डोलारा कोसळला. राहत्या घरासह गाव सोडून पुण्याला स्थलांतरित होण्याची वेळ मंगेशकर कुटुंबीयांवर आली. सांगलीतील शेवटचे हलाखीचे दिवस लता मंगेशकर यांना सर्वांत वेदना देणारे होते. शेवटपर्यंत त्यांना या घटना सतावत राहिल्या. प्रचंड उलथापालथ अनुभवत, अगदी लहान वयातच लता मंगेशकरांना सांगलीचा निरोप घ्यावा लागला होता.

जवळच्यांकडून घात -नातलग, स्नेही अशा सर्वांनी मास्टर दीनानाथ यांचा विश्वासघात केला. पडत्या काळात त्यांची साथ सोडली. ‘कृष्णार्जुनयुद्ध’ या सिनेमाच्या व्यवहारामध्ये एक खोटी केस दीनानाथ यांच्यावर झाली. एका मित्राने मदतीच्या बहाण्याने घरातील सर्व दागिने काढून घेतले. नंतरच्या सुवर्णकाळातही लता मंगेशकर कधीही या घटना विसरू शकल्या नाहीत.

पन्हाळ्यावरील बंगलास्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानातून सुटल्यानंतर त्यांना निवांत राहण्यासाठी भालजी पेंढारकर यांनी मूळ बंगला पन्हाळ्यावर बांधला. त्यावेळी त्यांनी तो पूर्ण चुन्यात बांधून घेतला होता. नंतर जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला आणि त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी स्टुडिओ, पन्हाळ्याचा बंगला लताबाईंना विकला. नंतर लताबाईंनी बंगला पूर्ण पाडण्याच्या सूचना केल्या व तिथे पुन्हा नवीन बंगला बांधला. 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरSangliसांगलीMaharashtraमहाराष्ट्रcinemaसिनेमा