सांगली : लोकसभेच्या सांगली मतदार संघासाठी उद्या (शुक्रवार) मतमोजणी होत असून, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून एकूण २४ फेर्यांमध्ये मतमोजणी होणार असून, दुपारी दीड वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी ६६६ कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रात जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय ६ विभाग करण्यात आले आहेत व एक टपाली मतमोजणी विभाग असे एकूण सात विभाग आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेल्या विभागांमध्ये प्रत्येकी १६ टेबल लावण्यात आले आहेत. एकूण ९० टेबल असून, या टेबलावरूनच मतमोजणीची प्रक्रिया होणार असून, सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचार्यांना सकाळी ६ वाजता नियुक्त केलेल्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सकाळी सात वाजता ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाचे सील उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. पहिल्यांदा टपाली मतदान व त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणीच्या एकूण २४ फेर्या होणार आहेत. सकाळी साडे नऊच्या सुमारास पहिल्या फेरीचा निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
मतमोजणीच्या २४ फेर्यानंतर निकाल सांगली लोकसभा : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधून उद्या होणार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला
By admin | Published: May 15, 2014 12:51 AM