ठळक मुद्देगर्भपातानंतर भ्रूणांची नातेवाईकांकडून विल्हेवाट, डॉक्टर रुपाली चौगुलेस अटकसांगली, कोल्हापूर, जिल्ह्यात भ्रूणांचे दफन; तासगाव तालुक्यातील नागाव कवठे येथे खोदकाम
सांगली : येथील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गर्भपात केलेल्या भ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाईकांकडेच दिली जात होती, अशी माहिती पोलीस पुढे आली आहे. नागाव-कवठे (ता. तासगाव) येथील महिलेचा गर्भपात केलेले भ्रूण नातेवाईकांनी त्यांच्याच शेतात पुरल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान गर्भपात आणि भ्रूणांची हत्या करणारी मुख्य संशयित डॉ. रुपाली विजयकुमार चौगुले (वय ३९, रा. सिद्धीविनायक नक्षत्र अपार्टमेंट, फेडरल बँकेसमोर, विश्रामबाग, सांगली) हिला अटक करण्यात आली आहे.
डॉ. रुपाली विजयकुमार चौगुलेगणेशनगरमधील पाचव्या गल्लीत चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपात करुन भ्रूणांची हत्या केली जात असल्याचा धक्कादायक चार दिवसापूर्वी उघडकीस आला होता. डॉ. रुपाली चौगुले, तिचा पती विजयकुमार चौगुले व सख्खा भाऊ डॉ. स्वप्नील जमदाडे या तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात वैद्यकीय गर्भपात प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर तपास करीत आहेत.
विजयकुमार चौगुलेरुग्णालयावर छापा टाकून गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधी गोळ्या, इंजक्शन, गर्भपात केलेल्या महिलांचे केसपेपर, दैनंदिन कामाच्या नोंदी असलेले रजिस्टर जप्त केले. ही कारवाई सुरु असताना डॉ. रुपाली चौगुले चक्कर येऊन कोसळली होती. गेली दोन दिवस तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती चांगली झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच तिला रविवारी रात्री ताब्यात घेतले होते. सोमवारी सकाळी तिला अटक दाखविण्यात आली.
डॉ. स्वप्नील जमदाडे गर्भपात केलेल्या महिलांच्या नावाचे केसपेपर सापडले आहेत. यावरुन पोलीस त्यांच्याकडे चौकशी करीत आहेत. नागाव-कवठेतील एका महिलेचा केसपेपर सापडला. पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना गाठून चौकशी केली. काही दिवसापूर्वी कुटूंबातील महिलेचा गर्भपात केल्याची कबूली नातेवाईकांनी दिली आहे.
तसेच डॉ. रुपाली चौगुले व तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले यांनी गर्भपात केलेल्या भ्रुणाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आमच्याकडेच सोपविली होती. त्यानुसार हे भ्रूण आमच्याच शेतात दफन केल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस, महापालिकेचे आरोग्य पथक व न्यायवैद्यक पथक तातडीने नागाव-कवठेला रवाना झाले.
शेतात खोदकाम करुन दफन केलेल्या भूणाचा शोध सुरु ठेवला आहे. गर्भपात केलेल्या सर्वच भ्रूणांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नातेवाईकांकडे सोपविली होती. हे नातेवाईक सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे त्यांनी भ्रूण त्यांच्यात भागात दफन केल्याचे स्पष्ट झाले आहे. याठिकाणीही भ्रूणांचा शोध सुरु ठेवला आहे.