शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

धरपकडीनंतर फोडाफोडी!

By admin | Published: June 02, 2017 11:16 PM

धरपकडीनंतर फोडाफोडी!

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव : शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी कोरेगावात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दूध अन् भाजीपाला रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. आंदोलनाची व्याप्ती पाहून पोलिसांनी आमदार शिंदेंसह पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. शिंदे यांना अटक झाल्याच्या चर्चेने संतप्त कार्यकर्त्यांनी तीन एसटी गाड्यांवर दगडफेक केली. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभर आंदोलकांची धरपकड करण्यात आली. याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारी शेतकरी संपाला सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला. सकाळी अकरा वाजता कोरेगावच्या आझाद चौकात आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजीपाला रस्त्यावर टाकून आंदोलन केले. पोलिसांना पूर्वसूचना न देता अकस्मात झालेल्या आंदोलनामुळे वाहतूक कोलमडली. यावेळी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रागसुधा रामचंद्रन, उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी फौजफाट्यासह आंदोलनस्थळी धाव घेत आमदार शिंदे यांच्यासह सुनील खत्री, राजाभाऊ जगदाळे व पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना पोलिस जीपमध्ये बसवून पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. शिंदे यांच्या अटकेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच वातावरण तणावाचे बनले. ‘कोरेगाव बंद’ची हाक देण्यात आली. पोलिसांनी बंद हाणून पाडण्याच्या दृष्टीने बळाचा वापर करुन कार्यकर्त्यांना ‘सळो की पळो’ करुन सोडले. व्यापाऱ्यांना दुकाने सुरु ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी सातारा-पंढरपूर महामार्गावर विविध ठिकाणी तीन एसटी गाड्यांना लक्ष्य करत काचा फोडल्या.तसेच शिंदे यांच्या अटकेच्या माहितीचे पडसाद नवी मुंबईतही उमटले. वाशी येथील मार्केट यार्डातील दुकाने व्यापाऱ्यांनी तत्काळ बंद केली. मुंबईहून कोरेगावात मोबाईल कॉल येऊ लागल्यानंतर कोरेगाव पोलिसांनी शिंदे यांना जामिनावर मुक्तता केले. त्यांना अटक केली नसून, त्यांच्यावर केवळ मुंबई पोलिस अधिनियमाप्रमाणे जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली असल्याचेही पोलिसांनी सांगितले. दुचाकीस्वारांनी फोडल्या एसटी बसेसआमदार शशिकांत शिंदे यांच्या अटकेची माहिती समजल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. कोरेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर दहिवडी-सातारा एस. टी. बस (एमएच ०७ सी ७१७८), साखळी पुलावर सातारा-आटपाडी एसटी बस (एमएच १४ बीटी १६८७) व रहिमतपूर-कोरेगाव रस्त्यावर पोलीस ठाण्यानजीक रहिमतपूर-कोरेगाव एसटी बस (एमएच १२ ईएफ ६७६१) या गाड्यांवर दगडफेक करीत काचा फोडल्या. दुचाकीवरून आलेल्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून काचा फोडल्या. तीनही एस. टी. बसेस पोलीस ठाण्याच्या आवारात नेऊन लावण्यात आल्या.