भिलवडी : कोरोनामुळे गेले आठ महिने बंद असलेला भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचा वाचन कट्टा हा उपक्रम १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आला. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष उद्योजक गिरीश चितळे होते.
यावेळी एनएमएमएस व शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गिरीश चितळे व जी. जी. पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. ‘पलूस तालुका आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनकट्टा सभासद संजय पाटील यांचाही ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी गिरीश चितळे, संजय पाटील, आरती बाबर, कार्यवाह सुभाष कवडे यांची भाषणे झाली. ‘माझे वाचन’ या विषयावर गिरीश चितळे, हणमंतराव डिसले, ह. रा. जोशी, आर. डी. चोपडे, डी. आर. कदम यांनी विचार मांडले. गिरीश चितळे यांनी वाचनालयात दिवाळी अंक भेट दिले. संजय पाटील यांनी एक हजार रुपये देणगी दिली. कार्यवाह सुभाष कवडे यांनी दर महिन्याच्या एक तारखेला वाचनकट्टा उपक्रम घेण्यात येईल, वाचक व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी वाचनालयाचे संचालक, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो : ०२ भिलवडी १
ओळ :
भिलवडी (ता. पलूस) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गिरीश चितळे, सुभाष कवडे, जी. जी. पाटील, संजय पाटील आदी उपस्थित हाेते.