राणेंच्या दमबाजीनंतर अजित पवारांनी केला बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 12:52 PM2021-07-27T12:52:23+5:302021-07-27T12:53:58+5:30

AjitdadaPawar Sangli : रायगडमध्ये केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरुन संताप व्यक्त केला होता. त्यावर टोला लगावतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यापुढे मंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्वाच्या अधिकाऱ्यांऐवजी नोडल अधिकारी उपस्थित राहतील, असा निर्णय घेतल्याचे सांगितले. ​​​​​​​

After Rane's arrogance, Ajit Pawar made arrangements | राणेंच्या दमबाजीनंतर अजित पवारांनी केला बंदोबस्त

राणेंच्या दमबाजीनंतर अजित पवारांनी केला बंदोबस्त

Next
ठळक मुद्देयापुढे नोडल अधिकारीच देणार माहितीजिल्हाधिकाऱ्यांसह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना गैरहजर राहण्याची मुभा

सांगली : रायगडमध्ये केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरुन संताप व्यक्त केला होता. त्यावर टोला लगावतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यापुढे मंत्र्यांच्या दौऱ्याला महत्त्वाच्या अधिकाऱ्यांऐवजी नोडल अधिकारी उपस्थित राहतील, असा निर्णय घेतल्याचे सांगितले.

नारायण राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले, व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यात प्रोटोकॉलनुसार अधिकाऱ्यांना जावेच लागते. त्यात आता उद्यापासून आणखी दौरे वाढणार आहेत. त्यामुळे नोडल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीला मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शवली आहे. नाही तर प्रत्येकजण इथे येऊन, तू कशाला इकडे गेला, तू कशाला तिकडे गेला असे म्हणत बसतील. त्यामुळे त्यांना आता नोडल अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागेल.

ते म्हणाले, पूरस्थिती नियंत्रणात आल्याने मंत्री व नेत्यांचे या भागातील दौरे वाढणार आहेत. मुळात अचानक आलेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांना वेळ देऊन काम करावे लागणार आहे. हे अधिकारी मंत्री, नेत्यांच्या दौऱ्यातच व्यस्त राहिल्यास उपाययोजना करण्यास अडचणी येणार आहेत. त्यामुळे आता या दौऱ्यात नोडल अधिकारी उपस्थित राहतील तर, जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून आपले काम करतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: After Rane's arrogance, Ajit Pawar made arrangements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.