शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

तीन महिन्यांनंतर म्हैसाळ योजना झाली सुरू

By admin | Published: November 07, 2014 10:44 PM

सुटकेचा नि:श्वास : थकित वीज बिल, तांत्रिक अडचणींसाठी योजना बंद

कवठेमहांकाळ : गेले तीन महिने तांत्रिक अडचणी, थकित वीज बिल अशा विविध कारणांनी अडलेले म्हैसाळ योजनेचे पाणी आजपासून सुरू करण्यात आले आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी सुरू झाल्याने मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.निवडणुकीच्या आधी म्हैसाळ योजनेसह इतर योजनेची थकित वीज बिले टंचाई निधीतून भरण्यात यावीत असा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आला होता. परंतु अद्याप ही वीज बिले टंचाई निधीतून न भरल्याने महावितरण म्हैसाळ योजनेसाठी विद्युत पुरवठा करण्यास तयार नव्हते. अखेर माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रशासनाला व प्रशासकीय अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले व निवडणुकीपूर्वी टंचाई निधीतून वीज बिल भरण्याचा घेण्यात आलेला निर्णय तातडीने अंमलात आणावा व म्हैसाळ योजनेचे थकित वीज बिल तातडीने टंचाई निधीतून भरण्यात यावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना दिल्या. जिल्हाधिकारी कुशवाह यांनीही त्याला ग्रीन सिग्नल दाखवित वीज बिल भरण्याचा निर्णय मान्य केला आणि महावितरणलाही तसे कळविले. त्यानंतर म्हैसाळ योजनेचे अडलेले पाणी अखेर आजपासून सुरू झाले.आर. आर. पाटील यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना, शेतकऱ्यांकडून अवाजवी पाणीपट्टी वसूल करू नये अशाही सूचना केल्या. ऊस, डाळिंब आणि द्राक्षबागेसाठी एकरी अडीच हजार रुपयेप्रमाणे पाणीपट्टी आकारावी, तसेच ज्वारीसाठी एकरी पाचशे पाणीपट्टी आकारावी अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांनीही म्हैसाळ योजना अवितरपणे चालू राहण्यासाठी पाणीपट्टी भरण्यासाठी पुढे यावे, असेही आवाहन त्यांनी केले.म्हैसाळ योजनेच्या पाण्याने दुष्काळी पट्ट्यातील सर्व तलाव भरून घ्यावेत. तलाव भरल्याने पाणी टंचाईच्या काळात त्याचा शेतीसाठी उपयोगात आणता येईल आणि पाण्यासाठी तारांबळ उडणार नाही, अशाही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आता म्हैसाळ योजना उन्हाळ्यापर्यंत सुरू ठेवण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)गेले तीन महिने म्हैसाळ योजना तांत्रिक अडचणी, थकित वीज बिल, थकित पाणीपट्टी यामुळे बंद होती. ऐन रब्बी हंगाम सुरू असताना म्हैसाळ योजना बंद होती. गेले १५ दिवस माजी गृहमंत्री आर. आर. पाटील म्हैसाळ योजनेच्या अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते. त्यांना पाणी सोडण्यासाठी सूचना करीत होते. परंतु प्रशासन केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम करीत होते.