शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Maratha Reservation: गावबंदीनंतर आता सांगली शहरात वार्डबंदी

By शीतल पाटील | Published: October 31, 2023 6:26 PM

सांगली : मराठा आरक्षणाच्या मागणीला सांगली जिल्ह्यातही जोर वाढला आहे. जिल्ह्यातील विविध गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. ...

सांगली : मराठा आरक्षणाच्या मागणीला सांगली जिल्ह्यातही जोर वाढला आहे. जिल्ह्यातील विविध गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. आता शहरातही राजकीय नेत्यांना वार्डबंदी करण्यात आली. कोल्हापूर रोड परिसरातील शामरावनगर वार्डात मराठा समाजाच्यावतीने वार्डबंदीचा निर्णय घेण्यात आला.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. कर्नाळ, बेडग,कसबेडिग्रज, मालगावसह जिल्ह्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. गावागावात उपोषण आंदोलने सुरू आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वणवा शहरातही पसरू लागला आहे. कोल्हापूर रोडवरील शामरावनगरमधील प्रभाग १८ मधील मराठा बांधवांनी एकत्र येत वार्डबंदीचा निर्णय घेतला आहे.प्रभाग १८ मध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मंगळवारी राजकीय नेते मराठा आरक्षणाला साथ देत नसल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनेही केली. मराठा आरक्षणाबाबत शासनाने लवकर निर्णय घ्यावा. मनोज जरंगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. काही दगा फटका झाल्यास शासन जबाबदार राहील. मराठा समाज दिवाळी सण साजरा करणार नाही. तरी लवकर विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणीही मराठा समाजाच्यावतीने करण्यात आली.यावेळी शैलेश पवार, स्वराज्य संघाचे प्रदेशाध्यक्ष महादेव साळुंखे, पंडित पाटील, संभाजी पोळ, बाळासाहेब जगदाळे, अण्णासाहेब थोरात, दत्तराज मेंगाणे यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण