जानेवारी महिन्यातील नवे रुग्ण - ४९३, मृत्यू - १६
फेब्रुवारी महिन्यातील नवे रुग्ण - ४०९, मृत्यू - ११
मार्च महिन्यातील नवे रुग्ण - ३,४२०, मृत्यू - ४४
- तीन महिन्यांतील एकूण मृत्यू - ७१
- मृत्यूसंख्येमध्ये ७५ ते ८५ वर्षे वयोगटातील ३०, ६५ ते ७४ वर्षे वयोगटातील १५, ५५ ते ६४ वयोगटातील १५, ४५ ते ५४ वयोगटातील ११ रुग्ण.
- नव्या संसर्गामध्ये ३० ते ४५ वयोगटातील तरुणांची संख्या जास्त
- झोपडपट्टीपेक्षा फ्लॅटमधील रहिवाशांची संख्या अधिक
- सध्या उपलब्ध बेड - १३४५
- शिल्लक बेड - ७०४
- विलगीकरणासाठी केलेली व्यवस्था - मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून, सध्या तेथे ३७ संशयित रुग्ण आहेत. त्याशिवाय जिल्हाभरात दोन हजार २८१ रुग्ण घरगुती विलगीकरणात आहेत.
- सध्या जिल्हाभरात शासकीय व खासगी अशा २२७ केंद्रांत लसीकरणाचे काम सुरू आहे. दररोज सरासरी १५ ते १८ हजार जणांचे लसीकरण होते. रुग्णसंख्या वाढेल तसा लसीकरणाचा वेगही वाढला होता. पण लसटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. गुरुवारी (दि. ८) जिल्ह्यात ३७हून अधिक ठिकाणी लसीकरण बंद पडले. महापालिकेकडे फक्त १६००, तर जिल्हा प्रशासनाकडे आठ हजार डोस शिल्लक होते.
- शासनाने जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत; पण त्याचे शंभर टक्के पालन होत नाही. दुकाने बंद करण्याला सार्वत्रिक विरोध सुरू आहे. दुकाने व बाजारपेठा बंद असूनही रस्त्यावर गर्दी आहे. मास्क नसल्यास दंडाची कारवाई दररोज सुरू असते, तरीही मास्क न घालता लोक फिरताना दिसतात.
कोट
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. पहिल्या लाटेपेक्षा जास्त रुग्ण सध्या आढळत आहेत. पण प्रशासन त्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. सध्या ११ रुग्णालये अधिग्रहित केली आहेत, आणखी १८ घेत आहोत. लोकांनी नियमांचे पालन करावे. कोरोनाविरोधातील लढ्यात प्रशासनाला सहकार्य करावे.
- डॉ.अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली
रुग्णसंख्या यापेक्षा अधिक वाढणार असल्याचे गृहीत धरून उपाययोजना सुरू आहेत. ग्रामीण भागापर्यंत उपाययोजना करणार आहोत. तेथील खासगी रुग्णालयेदेखील अधिग्रहित करण्याची तयारी आहे.
लसीकरणाची गतीही वाढवत आहोत.
- डॉ.संजय साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली