लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात वाढलेला कोरोनाचा कहर व वाढत्या संख्येमुळे बाधितांची संख्या ५० हजारांजवळ येऊन पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनास्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याने दिलासा मिळत असला तरी प्रशासनातर्फे उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत आहे. एकदा कोरोना हाेऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण नगण्य असून आतापर्यंत सरासरी तीन टक्केच रुग्णांना कोरोनाची केवळ लक्षणे आढळल्याची माहिती आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर पहिले तीन महिने जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात होती. त्याचा विस्फोट होत संपूर्ण जिल्हा कोरोेनाच्या विळख्यात सापडला होता. अगदी रुग्णांना उपचार मिळण्यासही अडचणी येत होत्या.
प्रशासनाच्या नियोजनानंतर गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात दिवसाला सरासरी १० ते १३ नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यातही अगोदर कोरोना झालेल्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजारांवर बाधित आढळले आहेत.
चौकट
जिल्ह्यातील एकूण बाधित----------
उपचारानंतर बरे झालेले रुग्ण ------------
उपचार सुरू असलेले रुग्ण------
आतापर्यंतचे कोरोनाबळी -------------
चौकट
तीन महिन्यांपर्यंत ॲन्टीबॉडी प्रभावी?
कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये विषाणूला प्रतिकार करणारी ‘ॲन्टीबॉडी’ तयार होते. आतापर्यंतच्या जिल्ह्यातील रुग्णांच्या अभ्यासानुसार किमान तीन महिन्यांपर्यंत त्या कार्यरत असल्याचे निदान झाले आहे. यावर आरोग्य यंत्रणेच्यावतीने नेहमीच अभ्यास सुरू आहे.
चौकट
खबरदारी हाच उपाय
१) राज्यातील काही भागात सध्या पुन्हा नव्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष न करता त्यापासून बचावासाठी उपाययोजनाच कोरोनापासून बचाव करू शकतात.
२) सध्या कोरोनाची लस आली असलीतरी अजूनही आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्सनाच लसीकरण सुरू आहे. सर्वसामान्यांना अद्याप लस मिळत नसल्याने काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
३) मास्कचा नियमित वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि वारंवार हात धुण्यासह वैयक्तिक स्वच्छताच बचावाचे आताचे तरी साधन आहे.
कोट
जिल्ह्यात सध्या बाधितांचे प्रमाण कमी असल्याने दिलासा असलातरी प्रत्येकाने अजूनही कोरोना गेला नसल्याने काळजी घ्यावी. एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा कोरोना होण्याचेही प्रमाण जिल्ह्यात खूपच कमी आहे.
डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक