हरिपूर , दि. २७ : सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरू असलेल्या विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत आक्रमक लढती झाल्या. सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या खेळाडूंनी चमकदार खेळ करत वर्चस्व मिळविले.
स्पर्धेचे उद्घाटन भारतीय तलवारबाजी महासंघाचे सहसचिव वीरेश यादव (उत्तराखंड), श्री गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश कोडते व खो-खो महासंघाच्या पंच समितीचे अध्यक्ष भूपेंदर सिंग (जम्मू- काश्मीर) यांच्याहस्ते लढत लावून झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल चोरमले होते. स्पर्धा समन्वयक शंकर भास्करे यांनी स्वागत केले. शुभम जाधव यांनी आभार मानले.
यावेळी विशाल कोळी, रामभाऊ सुतार, आदित्य चोरमले आदी उपस्थित होते. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
स्पर्धेचा अनुक्रमे एक ते चार क्रमांकांचा अंतिम निकाल असा : १९ वर्षे मुले : ईपी प्रकार : गिरीश जकाते (सांगली), प्रथम शिंदे (हातकणंगले), सिध्दांत जोशी (तासगाव), श्रेयस तांबवेकर (सांगली). १४ वर्षे मुले : ईपी : यश भंडारी (पेठवडगाव), अर्णव जगताप (तासगाव), ऋषिकेश पोवार (कोल्हापूर), प्रथमेश लाड (कुंडल). फॉईल : मार्तंड झोरे (रत्नागिरी), ऋषिकेश पोवार (कोल्हापूर), श्रीयश अनगळ (पेठवडगाव), वरद जकाते (पेठवडगाव). सेबर : पृथ्वीराज तेली (पेठवडगाव), हर्षवर्धन पवार (सांगली), केदार पाटील (पेठवडगाव), सुयश जमदाडे (वाई). १७ वर्षे मुले : फॉईल : श्रेयस भेंडवडे (पेठवडगाव), श्रवण काटकर (पन्हाळा), योगिराज पाटील (तासगाव), ओंकार चिटणीस (कुंडल). सेबर : जयंत पाटील, आदित्य शिंदे व प्रज्ज्वल कुंभोजे (तिघे पेठवडगाव), हर्षवर्धन पाटील (सांगली).
आदित्यराज घोरपडे, प्रफुल्ल धुमाळ, राहुल सरडे, दीपक क्षीरसागर, रोहित मोहिते, सुधीर जमदाडे, संजय झोरे, के. एकनाथ, संदीप जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. विजेत्या खेळाडूंची धुळे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.