शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

By admin | Published: May 09, 2017 11:26 PM

पाऊण लाख वृक्षांनी बहरलं ‘कृषी पर्यटन’

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरी भागातील पर्यटकांना ग्रामीण बाजाचं जगण देण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्र करत आहेत. जिल्ह्यात सध्या ४८ कृषी पर्यटन केंद्र सुरू झाली आहेत. तर सुमारे २५ पर्यटन केंद्रांचे काम प्रगतीपथावर आहे. पर्यटनाबरोबरचं पर्यावरणाचा वारसा जपण्यासाठी ही कृषी पर्यटन केंद्र आदर्शवत वाटचाल करत आहेत. एकेका पर्यटन केंद्रात सरासरी दीड ते दोन हजार वृक्षांची लागवड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाळी ही केंद्रे वाळवंटातील मरूद्यान ठरत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. सातारा तालुक्यातील बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्र हे जिल्ह्यातील पहिले केंद्र. कृषी पर्यटन केंद्र म्हणजे नेमके काय हे पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह बाहेरूनही लोकांचा राबता आता केंद्रावर राहिला. स्थानिक लोकांना रोजगार देण्याबरोबरचं निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न जिल्ह्याने अभिमानाने पुढे नेला. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात ४८ कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली आहेत. जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून रोजगाराची संधी आणि निसर्गाचा समतोल राखला गेला. त्याबरोबरच वृक्षारोपणाचा नवा पायंडाही पडला. कृषी पर्यटन केंद्रात आलेल्या पर्यटकांना शेतीचा बाज अनुभवायचा असेल तर केंद्राच्या परिसरात हिरवळ अपेक्षित आहे. त्यामुळे पर्यटन केंद्र चालकांनी आंबा, नारळ, चिक्कु, लिंबु, सागवान, कडुनिंब, बाभळ, फणस, केळ, सिताफळ, अ‍ॅपल बोर, गुलाब, झेंडु यांच्यासह विविध मसाल्यांची आणि काही परदेशी वाणाच्या झाडांची लागवड केली. पर्यटकांना झाडांची माहिती व्हावी हा त्या मागचा उद्देश होता. पण या उद्देशाच्या निमित्ताने एकेका कृषी पर्यटन केंद्रात दीड ते दोन हजार झाडांची लागवड झाली.जिल्ह्यात झपाट्याने वाढत जाणाऱ्या या कृषी पर्यटन केंद्रांमध्ये आता पर्यटकांचाही चांगला राबता आहे. काही पर्यटन केंद्रांनी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला रोपटे भेट देण्याचा नवा संकल्प केला आहे. यानिमित्ताने केंद्राची आठवण राहते आणि पर्यावरण रक्षण करण्याच्या कडीत त्यांना गुंफता येते, असे पर्यटन केंद्र चालकांचे मत आहे.जिल्ह्यातील या पर्यटन केंद्रांमुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रत्यक्षात उतरला असल्याचे समाधान येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून व्यक्त होत आहे. आजपासून पर्यटन विशेषांकवाचकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या ‘लोकमत’च्या सातारा आवृत्ती वर्धापन दिनानिमित्त दि. १० मे पासून पर्यटन विशेषांक प्रसिध्द करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, निसर्गाची मुक्त उधळण, इतिहासाची साक्ष देणारे किल्ले, पर्यटन क्षेत्रात असलेल्या व्यावसायिक संधी, जागतिक स्तरावर मिळालेले कोंदण आदी सर्वंकष माहितीचा खजीना या विशेषांकाद्वारे वाचकांच्या हाती पडणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव कॅक्टस गार्डनवनस्पती शास्त्रांत अत्यंत महत्वाचे मानले गेलेले मात्र, माणसांना त्रासदायक असणारे कॅक्टसचे झाड आता फार कमी ठिकाणी पहायला मिळते. बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्रात दुर्मिळ अशा ८२ प्रकारच्या कॅकटसचे स्वतंत्र गार्डन केले आहे. दुर्मिळ वनस्पती एकत्र पहायला मिळाव्यात या उद्देशाने या गार्डनची आखणी केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा प्रयोग बोरगाव येथे केला आहे.